टेम्पल रोझच्या संचालकाला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

पुणे - प्लॉट खरेदी केल्यानंतर गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून पाच लाख 53 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी टेम्पल रोझ रिअल इस्टेटच्या संचालकाला लष्कर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने संचालक देविदास गोविंदराम सजनानी (रा. मुंबई) याला बुधवार (ता. 26) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

याप्रकरणी सजनानीसह आणखी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पिंकी हसिजा (वय 41, रा. कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. सजनानी यांनी हसिजा आणि त्यांच्या वडिलांना जादा परतावा देण्याच्या आमिषाने जागा खरेदी करण्यास भाग पाडले. त्यासाठी पाच लाख 53 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले. 

विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयात सजनानी याला हजर करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. तपासादरम्यान, सजनानी आणि त्याच्या साथीदारांनी एक कोटी 73 लाख 47 हजार रुपयांची गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असून, त्यादृष्टीने तपास करायचा आहे, त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील सुनील हांडे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.