राजस्थानच्या तरुणाकडून साडेतेरा लाखांचे अफीम जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पुणे - राजस्थान येथील एका तरुणाकडून साडेतेरा लाख रुपयांचे अफीम जप्त करण्यात आले. धनकवडी परिसरात गुरुवारी सायंकाळी ही कारवाई केल्याची माहिती आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांनी दिली. 

पुणे - राजस्थान येथील एका तरुणाकडून साडेतेरा लाख रुपयांचे अफीम जप्त करण्यात आले. धनकवडी परिसरात गुरुवारी सायंकाळी ही कारवाई केल्याची माहिती आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांनी दिली. 

सत्यनारायण शंकर आहिर (वय 32, रा. आंबेगाव पठार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो मूळचा राजस्थानच्या चित्तोडगड जिल्ह्यातील भाटोली गुजराण येथील आहे. तो धनकवडी परिसरात शिवकॉलनी बसथांब्याजवळ उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या वेळी झडती घेतली असता त्याच्याकडे प्लॅस्टिक बॅगेत चार किलो 718 ग्रॅम अफीम आढळून आले. या अमली पदार्थाची किंमत सुमारे साडेतेरा लाख रुपये इतकी आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस ऍक्‍टनुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास किमान 10 ते 20 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले. 

गुन्हे शाखेचे अतिरिक्‍त आयुक्‍त प्रदीप देशपांडे, पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ आणि सहायक आयुक्‍त मिलिंद पाटील यांच्या सूचनेनुसार अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुनील दोरगे, हवालदार अविनाश शिंदे, ज्ञानदेव घनवट, विठ्ठल खिलारे, राजकुमार पाटील, नितीन सानप, स्नेहल जाधव यांनी ही कारवाई केली. 

Web Title: pune news crime