कर्जाच्या आमिषाने साडेसात लाखांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

पुणे - कंपनीवरील नऊ कोटी रुपयांचे कर्जफेड करण्याऐवजी नवीन कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एका उद्योजकाची साडेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

राकेश थापर (रा. नवी दिल्ली), भूपेश जयंत औरंगाबादकर (वय 44, रा. कळमकर पार्क, बालेवाडी फाटा), गिरीश पालसिंग हरिशपालसिंग सांब्याल (वय 53, रा. वीरभद्र नगर, बाणेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विक्रम कदम (वय 59, रा. बाणेर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कदम यांची "अमर सीड्‌स प्रा. लि.' नावाची कंपनी आहे. त्यावर नऊ कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे बॅंकेकडून घेतलेले कर्ज एकरकमी परतफेड करून त्याऐवजी नवीन कर्ज मिळवून देतो, अशी बतावणी थापर याने त्यांना केली. त्यांची मार्च 2015 ते मार्च 2017 या कालावधीत फर्ग्युसन रस्त्यावरील ललित महल हॉटेलसमोरील अमर सीड्‌स या कंपनीमध्ये बैठका झाल्या. कदम यांनी थापर यांना साडेसात लाख रुपये दिले. परंतु त्यांचे कर्ज परतफेड न करता व नवीन कर्ज न मिळवून देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक निरीक्षक झांजुर्णे करत आहेत.

टॅग्स