महा बँकेच्या अधिकाऱ्यांना गैरव्यवहारप्रकरणी अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

पुणे - बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या पुण्यातील तत्कालीन क्षेत्रीय अधिकाऱ्यासह सुरत येथील खासगी लॉजिस्टिक्‍स कंपनीच्या संचालकाला बॅंक फिक्‍सिंगप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषणने (सीबीआय) अटक केली आहे. ‘चालक से मालक’ या योजनेअंतर्गत सुमारे ८३६ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

सुरत येथील सिद्धिविनायक लॉजिस्टिक्‍स लिमिटेड कंपनीने २०१२ मध्ये ‘चालक से मालक’ ही योजना सादर केली. रूपचंद बैद हा या कंपनीचा संचालक आहे. त्याने कंपनीतील चालकांना ट्रकचे मालक होण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी काही ट्रक बॅंक ऑफ महाराष्ट्रकडे गहाण ठेवण्यात आल्याचे दाखविण्यात आले होते. या कंपनीला दोन हजार ८०२ चालकांना ट्रक खरेदीसाठी कर्ज लागणार होते. त्यासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रकडून कंपनीला अंदाजे ८३६ कोटी २९ लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात आले. मात्र संबंधित चालकांना याबाबत माहिती नव्हती. कर्ज मंजुरीसाठी त्या चालकांच्या बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला. 

अन्य तीन बॅंकांनाही तोटा 
सीबीआयने अन्य काही खासगी कंपन्यांच्या संचालकांविरुद्ध याचिका दाखल केली आहे. या संचालकांवर ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स, बॅंक ऑफ बडोदा आणि इंडियन ओव्हरसीज बॅंकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या बॅंकांना सुमारे दीड हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.