नौदल अधिकाऱ्याची फसवणूक; बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

पुणे - महापालिकेकडून बांधकाम सुरू करण्याचा बनावट दाखला दाखवून बांधकाम व्यावसायिकाने नौदलातील एका अधिकाऱ्याची 47 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला यापूर्वी अन्य एकाची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. 

दीपक यशवंत पाटील (वय 51, रा. करिष्मा सोसायटी, कोथरूड) असे कथित बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट ऍक्‍ट (मोफा) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अतुल दिवेकर (वय 55, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नौदलात अधिकारी असून, दीपक पाटील हा कथित बांधकाम व्यावसायिक आहे. त्याने मौजे बालेवाडी येथील 

सर्वे क्रमांक 42 मध्ये सिद्धांत हाइट्‌स गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू केल्याचे दाखवले. त्यासाठी महापालिकेकडून बांधकामाची परवानगी मिळाल्याचा बनावट दाखला फिर्यादींना दाखवला. त्याने फिर्यादी दिवेकर यांच्याकडून फ्लॅटसाठी 59 लाख 50 हजार रुपये तसेच नोंदणी आणि स्टॅंप ड्यूटीसाठी 7 लाख 65 हजार रुपये असे एकूण 67 लाख 15 हजार रुपये घेतले; मात्र गृहप्रकल्पात सात मजले बांधकामाची परवानगी असताना त्याने 11 मजल्यांचे बांधकाम केले. शिवाय, दिवेकर यांना मुदतीत फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे त्यांनी पैसे परत मागितले. त्यानंतर त्याने 20 लाख रुपये परत केले; मात्र उर्वरित 47 लाख रुपये परत न देता त्यांची फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर हे करत आहेत. 

Web Title: pune news crime builder