अतिक्रमणांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

पुणे - बाजीराव रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर महापालिका प्रशासनाने गुरुवारी कारवाई केली. येथील बेकायदा हातगाड्या, स्टॉलसह हॉटेल आणि दुकानासमोरील अतिक्रमणे हटविण्यात आली. ही कारवाई नियमित सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, बेशिस्त वाहने आणि चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. 

वाहनांची प्रचंड वर्दळ असलेल्या बाजीराव रस्त्यालगत दोन्ही बाजूला परवानगी नसतानाही वाहने उभी केली जातात. तसेच, येथील व्यावसायिकांकडील मालाची ने-आण करणारी वाहनेही रस्त्यावरच उभी केली जात असल्याने वाहतूक विस्कळित होत असल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडीत भर पडत असून, वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच, जागोजागी बेकायदा स्टॉल, हातगाड्या उभ्या असतात. तर, हॉटेल आणि दुकानासमोरही वस्तू मांडण्यात आल्या आहेत. त्यातील बहुतेक व्यावसायिकांनी पदपथावरच अतिक्रमणे केली असल्याने पादचाऱ्यांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍नही गंभीर बनला आहे. 

या पार्श्‍वभूमीवर येथील बेकायदा व्यावसायिकांवर कारवाईची मोहीम महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हाती घेतली असून, हॉटेल आणि दुकानासमोरील अतिक्रमणे हटविण्यात आली. तसेच, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ही कारवाई सातत्याने करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने स्पष्ट केले. 

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या प्रमुख संध्या गागरे म्हणाल्या, ‘‘शहराच्या सर्वच भागातील अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून, बाजीराव रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली. या पुढील काळात बाजीराव रस्त्यावर बेकायदा व्यावसायिक दिसणार नाहीत. त्यांच्यावर नियमित कारवाई होईल. त्यासाठी संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. ’’

वाहतूक पोलिसांकडून कारवाई नाही
बाजीराव रस्त्यावर अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेण्यात आली असली तरी, वाहतूक शाखेच्या खडक आणि विश्रामबाग पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्यावर अजूनही बेकायदा वाहने उभी केली जात आहेत. मालाची ने-आण करणारी वाहने रस्त्यावरच असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मात्र, अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.