अनधिकृत इमारतीवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

पुणे - बेकायदा, विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी नऱ्हे येथील तीन मजली निवासी इमारतीवर गुरुवारी (ता.२५) सकाळी दहाच्या सुमारास कारवाई करण्यात आली. 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. नऱ्हे येथील सर्व्हे नं.५/१/१ येथील विशाल राजेंद्र भुमकर, राजेंद्र म्हस्कू भुमकर यांना अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ कलम ५३, ५४ अंतर्गत नोटीस दिली होती. 

सुमारे २ हजार २०० चौरस फुटांचे पार्किंगसह तीन मजल्यांचे बांधकाम सुरू होते. या नोटिशीकडे दुर्लक्ष करत बांधकाम सुरू ठेवल्याने आज सकाळी पोलिस बंदोबस्तात बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.  

पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, तहसीलदार विकास भालेराव, उपअभियंता वसंत नाईक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू जगताप, पोलिस निरीक्षक बबन खोडके, सहायक पोलिस निरीक्षक गडकरी आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.

पुणे

पुणे - ""नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस तत्पर आहेतच. पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत सजग असले पाहिजे; परंतु...

02.00 AM

पुणे - महापालिकेच्या दरपत्रकात (डीएसआर) समाविष्ट नसलेल्या वस्तू आणि सेवांचे दर ठरविण्याचे खातेप्रमुख आणि नगर अभियंत्यांचे अधिकार...

01.48 AM

पिंपरी - पवना धरणापासून महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या प्रकल्पाचा अंदाजित खर्च नियोजित रकमेच्या...

01.30 AM