सरस्वतिपूजन, सोने लुटण्यासह खरेदीची लगबग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

पुणे - साडेतीन मुहूर्तांपैकी एक आश्‍विन शुद्ध दशमी (विजया दशमी) अर्थात दसरा उद्या (ता. ३०) आहे. यानिमित्त पाटीवर रेखाटलेल्या सरस्वतीला आपट्याची पाने, फुले वाहून पूजा, नव्या कार्याचा शुभारंभ करण्याची, आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून लुटण्याची, मुहूर्तावर नव्या वस्तूंच्या खरेदीची लगबग घरोघर सुरू आहे. मंदिरे आणि मंडळांमध्ये सीमोल्लंघनानिमित्त देवीचा छबिना, रथातून वाजतगाजत मिरवणूक काढण्याची लगबग सुरू आहे. यासाठी वरुणराजाच्या उपस्थितीत खरेदीसह बुकिंगकरिता अनेकांनी खंडेनवमीचा मुहूर्त निवडला. 

हस्त नक्षत्र सुरू झाल्याने खंडेनवमीला पाऊस जोरदार बरसला. तरीही पावसात भिजत आनंदोत्सवात अनेकजण धार्मिक पूजा साहित्यासह विविध वस्तू खरेदी करत होते. मिठाईच्या दुकानांतही नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. पूजा साहित्य खरेदीसाठी महात्मा फुले मंडई, तुळशीबाग परिसरात दिवसभर नागरिकांची वर्दळ होती. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांतही अनेक ठिकाणी पथारीवाले झेंडूची फुले, आपट्याच्या पानांसह विड्याची पाने तसेच पूजा साहित्याची विक्री करीत होते. इलेक्‍ट्रॉनिक व इलेक्‍ट्रिक वस्तूंची बाजारपेठही नानाविध वस्तूंनी बहरली आहे. 

आश्‍विन शुद्ध नवमीचे (महानवमी) औचित्य साधून पुरातन मंदिरांत देवीची ओटी भरण्यासाठी पहाटेपासूनच महिलांनी रांगा लावल्या होत्या. तत्पूर्वी खंडेनवमीनिमित्त देवीच्या मंदिरांमध्ये शस्त्रपूजन झाले. किरकोळ दुकानदार, व्यापाऱ्यांनीदेखील शस्त्रपूजन केले. कुलाचार व प्रथेप्रमाणे बहुतेकांच्या घरी नवमीला घट उठले, तर काहींच्या घरी दशमीला घट उठविण्याची प्रथा असून, कोणी सत्यनारायणसह अन्य धार्मिक कार्यक्रमही आयोजितात. त्यामुळे केळीचे खुंट, ऊस, आंब्याच्या डहाळ्या, आपट्याची पाने, नारळाची 

तांबडी जोगेश्‍वरीची ग्रामप्रदक्षिणा साडेदहा वाजता 
विजया दशमीला (ता. ३०) ग्रामदैवत तांबडी जोगेश्‍वरी देवीची ग्रामप्रदक्षिणा सकाळी साडेदहा वाजता निघेल. मंदिरापासून बुधवार चौक, रामेश्‍वर चौक, शनिपार चौक, अप्पा बळवंत चौक ते पुन्हा मंदिर अशी ही प्रदक्षिणा असेल. चांदीच्या पालखीत विराजमान झालेल्या जोगेश्‍वरी देवीसमोर आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बॅंड, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक असेल, अशी माहिती मानाचा दुसरा तांबडी जोगेश्‍वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांनी दिली.