देखावे, मंडप, रथ रस्त्यावरच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

पुणे - शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षातील गणेशोत्सव मोठ्या आनंदात पार पडला. उत्सवानंतर एक-दोन दिवसांत रस्त्यावर उभारलेले मंडप, कमानी, विसर्जन मिरवणूक रथ व देखावे काढणे आवश्‍यक होते; मात्र गणेश विसर्जनास पाच दिवस उलटूनही अनेक मंडळांनी देखावे, मंडप उतरविलेले नाहीत.

गणेशोत्सवानंतर काही मोजक्‍या मंडळांनी देखावे, मंडप उतरविण्याचा प्रयत्न केला; परंतु बांबू, लोखंडी खांब व अन्य साहित्य पदपथावरच टाकले आहे. त्यामुळे रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालण्याची वेळ पादचाऱ्यांवर आली आहे. दुसरीकडे मंडप, देखावे काढले नसल्यामुळे रहदारीच्या वेळी वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे. बहुतांश गणेशोत्सव मंडळे मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, प्रमुख चौक आणि रहदारीच्या ठिकाणांवर आहेत. त्यांनी तर तत्काळ मंडप, देखावे काढून रस्ता वाहतुकीस खुला करून देण्याची गरज असते; परंतु त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, पादचाऱ्यांसह वाहनचालकांची गैरसोय होत आहे. महापालिका प्रशासनही त्यांनी विविध ठिकाणी उभारलेले मंडप काढण्याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून आले.