देशी गोवंश पुस्तकाचे येत्या शुक्रवारी प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

पुणे - देशी गोपालनाच्या शास्त्रशुद्ध पद्धतीची माहिती देण्यासाठी सकाळ प्रकाशन ‘देशी गोवंश’ हे पुस्तक प्रकाशित करत आहे. हे प्रकाशन येत्या शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी ६ वाजता घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. 

ज्येष्ठ शास्त्रज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असून, राज्य पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप व ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.

गोधन हा आपल्या कृषी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. गोपालनासारख्या शेतीपूरक उद्योगांमधून शेतकरी व गोपालकांना आर्थिक फायदा मिळू शकतो. त्यांचे जीवनमान उंचावू शकते; पण त्यासाठी व्यावसायिक पद्धतीने देशी गोवंशाचे संगोपन व संवर्धन केले पाहिजे, यासाठी हे पुस्तक निश्‍चित मार्गदर्शक ठरणार आहे.

या पुस्तकात ‘सकाळ अग्रोवन’मधील निवडक लेखांसह तज्ज्ञ अभ्यासकांच्या पूरक लेखांचा नव्याने समावेश केला आहेत. यात देशी गाईंच्या विविध प्रजाती व उपजाती, तिची वैशिष्ट्ये, आधुनिक गोपालन तंत्रे, उपलब्ध गोवंशापासून जातिवंत पशुधनाची निर्मिती, याबद्दलची माहिती तपशीलवार दिली आहे. आजार व रोगांवर मात करत दूध उत्पादन व प्रजनन क्षमतेत सातत्य राखण्याची नैसर्गिक क्षमता देशी गाईंमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. ही क्षमता वाढावी व गाईंना होणारे विविध रोग व आजारांवर नेमके कोणते उपचार करावेत, याबद्दलही हे पुस्तक मार्गदर्शन करते. विविध गोशाळा व गोपालकांचा स्वानुभव हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

‘देशी गोवंश’ या पुस्तकाची किंमत रु. २४० असून, कार्यक्रमस्थळी हे पुस्तक व ‘सकाळ प्रकाशन’ची इतर दर्जेदार पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध होतील. तसेच ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयात, सर्व आवृत्ती कार्यालयांत आणि महाराष्ट्रातील प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत.

पुस्तकांच्या ऑनलाइन खरेदीसाठी sakalpublications.com वर लॉग इन करावे.
अधिक माहितीसाठी संपर्क - ०२०-२४४०५६७८ किंवा ८८८८८४९०५० (कार्यालयीन वेळेत)