सासवडला कऱहेकाठी पत्रकारांतर्फे शुक्रवारी `दिवाळी पहाट` रंगणार

श्रीकृष्ण नेवसे
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

संगीत सम्राट फेम सोहम गोराणे, चैतन्य देवढे (पाटील), ज्योती गोराणे, व अन्य कलाकार यात सहभागी होतील. निवेदन अभय नलगे यांचे आहे. यास साकुर्डे गावच्या कन्या व पुणे जिल्हा परीषदेच्या सदस्या जयश्री सत्यवान भुमकर व युवा कार्यकर्ते सागर सत्यवान भुमकर हे कार्यक्रमास प्रायोजक आहेत

सासवड - कऱहेकाठी सासवड (ता. पुरंदर) नगरीत दिवाळी पहाट हा सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्याचे हे बारावे वर्ष आहे. यंदा हा सोहळा शुक्रवारी (ता. 20) दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पहाटे 5.30 वाजता रंगणार आहे. आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनाच्या रंगमंचावर श्याम गोराणे प्रस्तृत `स्वर ज्योर्तिमय शाम` हा गीत संगिताचा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत होत आहे.

सासवड शहर पत्रकार संघाने आपली सांस्कृतिक परंपरा जपत सासवड व एकुणच पुरंदर तालुक्यातील विविध वृत्तपत्रांचे वाचकवर्ग आणि रसिकांसाठी हा कार्यक्रम देण्याची याही वर्षी तयारी केली आहे. भल्या पहाटे आकाशकंदील, पणत्या लावून व रोषणाई करुन गंधित फुलमाळांच्या संगतीत हा सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे. संगीत सम्राट फेम सोहम गोराणे, चैतन्य देवढे (पाटील), ज्योती गोराणे, व अन्य कलाकार यात सहभागी होतील. निवेदन अभय नलगे यांचे आहे. यास साकुर्डे गावच्या कन्या व पुणे जिल्हा परीषदेच्या सदस्या जयश्री सत्यवान भुमकर व युवा कार्यकर्ते सागर सत्यवान भुमकर हे कार्यक्रमास प्रायोजक आहेत.

यंदाही या सोहळ्यात उल्लेखनिय काम करणाऱया काही व्यक्तींचा मध्यंतरात सन्मानचिन्हे देऊन खास गौरव होणार आहे. तर दिवाळी शुभेच्छा काही मान्यवर देतील., असे सासवड शहर पत्रकार संघाच्या वतीने सांगण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजक व पत्रकार श्रीकृष्ण नेवसे, हेमंत ताकवले, सुधीर गुरव, बाळासाहेब कुलकर्णी, जीवन कड, संभाजी महामुनी, जगदीश शिंदे, मनोज मांढरे, तानाजी सातव, शिवाजी कोलते, शकील बागवान, सुनिल वढणे आदी करीत आहेत.