दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पुणे - ऑक्‍टोबर महिन्याचा पहिला आठवडा आणि रविवारच्या सुटीचे निमित्त साधत पुणेकरांनी दिवाळीची खरेदी करण्यास सुरवात केली. त्यामुळे विविध बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. पुढील आठवड्यात दिवाळी असल्याने खरेदीचे प्रमाण आणखी वाढणार आहे. 

पुणे - ऑक्‍टोबर महिन्याचा पहिला आठवडा आणि रविवारच्या सुटीचे निमित्त साधत पुणेकरांनी दिवाळीची खरेदी करण्यास सुरवात केली. त्यामुळे विविध बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. पुढील आठवड्यात दिवाळी असल्याने खरेदीचे प्रमाण आणखी वाढणार आहे. 

गेल्या आठवड्यात ग्राहकांकडून खरेदीसाठी विशेष प्रतिसाद नसल्याने व्यापारी चिंतेत होते. आता वेतन आणि बोनसची रक्कम हाती आल्याने नोकरदार वर्ग रविवारी खरेदीसाठी बाहेर पडला. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीस सुरवात झाल्याचे चित्र शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत दिसले. आकाशकंदील, दिव्यांच्या माळा आदींबरोबरच कपडे, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर होता. लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, रविवार पेठेसह शहरातील विविध भागांतील मॉलमध्ये ग्राहकांची संख्या तुलनेत वाढली. 

याबाबत कापड व्यावसायिक मनोज सारडा म्हणाले, ""गेल्या काही दिवसांपेक्षा रविवारी ग्राहकांची गर्दी वाढली होती. लहान मुले आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी केली. पुढील काही दिवसांत दिवाळीसाठी खरेदी वाढेल. येत्या रविवारी ग्राहकांचा आणखी प्रतिसाद वाढलेला दिसेल''. 

मध्यवर्ती भागात आलेल्या ग्राहकांना वाहन पार्किंगचा प्रश्‍न भेडसावत होता. काहींनी नदीलगतच्या रस्त्यावर, मोकळ्या जागेत वाहने उभी करून खरेदीला जाणे पसंत केले. संकष्टी चतुर्थीमुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठीही भाविक मोठ्या संख्येने येत असल्याने या भागातील गर्दी आणखी वाढली होती. 

टॅग्स