'आपल्यातील चित्रकाराला वाट करून द्यावी'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

पुणे - "चित्रकला शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये दडलेला चित्रकार घडविण्यासाठी एलिमेंटरी-इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा हे पहिले पाऊल म्हणावे लागेल. त्यामुळे या परीक्षांमध्ये सहभागी होऊन आपल्यातील चित्रकाराला वाट करून द्यावी,' अशा शब्दांत कलाध्यापकांनी विद्यार्थ्यांना चित्रकला आणि चित्रकला ग्रेड परीक्षांचे महत्त्व "सकाळ एनआयई' (न्यूजपेपर इन एज्युकेशन) तर्फे आयोजित कार्यशाळेत समजावून सांगितले. 

"सकाळ एनआयई'तर्फे आयोजित एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामध्ये अभिनव कला विद्यालयातील रामकृष्ण कांबळे, रमेश गाढवे, बालाजी चौगुले यांनी विद्यार्थ्यांना वस्तुचित्र, स्मरणचित्र, स्थिरचित्र, अक्षरलेखन व भौमितिक रचना यावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका छाया आंधळे, पर्यवेक्षिका मृगजा कुलकर्णी, कलाशिक्षिका स्नेहल रिसबूड, सहशिक्षिका सुमती पाटील, वामा कादगे, प्रशांत बुद्धिहाळ आणि महेश इंगळे उपस्थित होते. पाचवी ते दहावीतील सुमारे 500 विद्यार्थी व शिक्षकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. रमेश गाढवे यांनी दोन्ही परीक्षांचा पुनर्रचित अभ्यासक्रम आणि परीक्षेसाठी कशी तयारी करावी या विषयी तसेच चित्रे कशी रेखाटावी या विषयी माहिती दिली. आकृत्या, आकार व रंग यांचे प्रमाण कसे असावे हेही त्यांनी सांगितले. 

गाढवे म्हणाले, ""चित्रकलेला कोणताही विषय असला तरी चित्र काढणे विद्यार्थ्यांना जमले पाहिजे. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षांमुळे मिळतो. विद्यार्थ्यांमधील चित्रकाराला यातून एक वेगळीच वाट मिळते.'' 

"एनआयई'कडून शैक्षणिक वर्षात विविध उपक्रम राबविले जातात, ही कार्यशाळा या उपक्रमाचा एक भाग होती. कार्यशाळेला प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूलचे (मुलांचे) विशेष सहकार्य लाभले. भारती विद्याभवन, शारदा विद्यालय, साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर, चंद्रकांत दरोडे विद्यालय, रेणुका स्वरूप हायस्कूल, रमणबाग हायस्कूल आणि संत श्री ज्ञानेश्‍वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना कार्यशाळेत सहभाग घेतला. 

सातवीत शिकणारी साक्षी कापसे म्हणाली, ""कार्यशाळेत चित्रकलेतील बारकावे शिकता आले. चित्र कसे काढायचे याविषयीची माहितीही मिळाली.''

Web Title: pune news drawing sakal nie

टॅग्स