डीएसकेंची प्रकृती चांगली 

डीएसकेंची प्रकृती चांगली 

पुणे - ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डी. एस. कुलकर्णी (वय 68) आणि त्यांच्या पत्नी हेमंती (वय 59, दोघेही रा. सेनापती बापट रस्ता) यांना 1 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश शुक्रवारी न्यायालयाने दिले. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी हे आदेश दिले. 

न्यायालयाने 17 फेब्रुवारी रोजी डीएसके दांपत्याला पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान 18 डिसेंबर रोजी डीएसकेंची प्रकृती बिघडल्याने पोलिस कोठडी अबाधित ठेवून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. उपचारासाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले होते. त्या वेळी शुक्रवारी (ता. 23) ससून रुग्णालयात त्यांना हजर करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार आज सकाळी त्यांना ससून रुग्णालयात हजर करण्यात आले. त्यांची प्रकृती चांगली असल्याचा अहवाल ससून रुग्णालयाच्या मेडिकल बोर्डाने दिला. त्यानुसार त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने हेमंती यांना न्यायालयात हजर केले असता विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. 

ऍड. चव्हाण म्हणाले, ""डीएसके ग्रुपमधील कंपन्यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या परवानगीशिवाय गुंतवणूकदारांकडून ठेवी स्वीकारल्या आहेत. डीएसके ग्रुपने 2013-14 आणि 2014-15 मध्ये सहा कंपन्या स्थापन केल्या आहेत. त्या कोणाच्या सांगण्यावरून स्थापन केल्या, याबाबत भागीदारी फर्म लेखापाल यांची भूमिका काय आहे. ड्रीम सिटीसह पुणे शहरात 13 आणि अंधेरी येथे एक गृहप्रकल्प असल्याचे सांगितले आहे. मात्र, यासंबंधी ठेवीदारांचे रजिस्टर मिळत नाही. डीएसकेंच्या कंपन्यांनी नातेवाइकांच्या मध्यस्थीने जमिनी खरेदी केल्या आहेत. तसेच डीएसके दांपत्याने बॅंकांकडून 2 हजार 892 कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. या पैशाचे काय झाले?, 1 हजार 153 कोटी रुपयांचे ठेवीदारांचे पैसे देणे आहेत. हा पैसा इतर व्यवसायात वळविला आहे का, त्यातून वैयक्तिक मालमत्ता खरेदी केली आहे का? फ्लॅटधारकांनी बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाचे पैसेही डीएसके ग्रुपकडे आले आहेत. मुलगा शिरीष याच्या खात्यावर कंपनीच्या खात्यातून 163 कोटी रुपये वळविण्यात आले आहेत. याबाबत तपास करायचा आहे.'' पोलिस कोठडीत हेमंती या पोलिसांना जुजबी उत्तरे देत आहेत, त्यामुळे पोलिस कोठडी देण्याची मागणी ऍड. चव्हाण यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने डीएसके दांपत्याला पोलिस कोठडी सुनावली. बचाव पक्षातर्फे ऍड. श्रीकांत शिवदे यांनी काम पाहिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com