खोदाईमुळे सातारा रस्त्यावर कोंडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

सहकारनगर - सातारा रस्त्यावरील पद्मावतीकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या सुराणा चौकात दुभाजक काढून त्याचा राडारोडा रस्त्याच्या कडेला टाकल्याने वाहनांना अडथळा होत आहे. रांका ज्वलर्ससमोर खोदाई केल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.

उजव्या बाजूला बिबवेवाडीकडे वळताना वाहनचालकांमध्ये वाद-विवाद होत असतात. महिन्यापासून हा रस्ता खोदून ठेवला असल्याने वाहतूक कोंडीला वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. 

सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम म्हणाले, की सातारा रस्त्यावरील कामामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. याकडे महापालिका प्रशासन व ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे. चार दिवसांपूर्वी दुचाकीस्वार महिला खोदाई केलेल्या खड्ड्यात पडल्याने जखमी झाली. खोदलेल्या खड्ड्यात सध्या पावसाचे पाणी साचत असून, पाण्यामुळे या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. मनपा प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून संबंधित ठेकेदारावर 
कारवाई करावी.

ठेकेदारावर कारवाई करणार
महापालिकेचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश बार्शीकर म्हणाले, ‘‘सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गावरील दुभाजक काढून रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असून, या ठिकाणी बॅरिकेड्‌स टाकून समांतर रस्ता करून घेतला जाईल व ठेकेदारावर योग्य ती कारवाई केली जाईल.’’