‘हार्मोनिक्‍स’ नोटिसांबाबत महावितरणने विचार करावा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

पुणे - हार्मोनिक्‍स (विद्युतपुरवठा प्रदूषित करणारा घटक) विषयी औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांना मिळालेल्या नोटिसांमुळे खळबळ माजली आहे. यात नमूद केल्याप्रमाणे वेळेत कार्यवाहीची पूर्तता न केल्यास वीजपुरवठा बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात काळजीचे वातावरण आहे. महावितरण कंपनीने या नोटिसांबाबत विचार करावा, अशी मागणी या ग्राहकांकडून होत आहे.

हार्मोनिक्‍स म्हणजे काय, विद्युत प्रदूषण म्हणजे काय, असे अनेक प्रश्‍न नागरिकांना भेडसावत असतात. याबाबत एनर्जी ऑडिटर नरेंद्र दुवेदी यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला दिलेल्या भेटीप्रसंगी माहिती दिली. वीजप्रवाहातील प्रदूषण म्हणजे ‘हार्मोनिक्‍स’ हा एक घटक होय. ‘हार्मोनिक्‍स’चे औद्योगिक क्षेत्रातील प्रमाण वाढत असल्याचे दुवेदी यांनी सांगितले. हे प्रदूषण मर्यादेत ठेवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना महावितरणने औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांना केली आहे. त्यामुळे सध्या हा विषय चर्चेत आला आहे. वीजप्रवाह प्रदूषित झाल्यास त्याचे पुरवठ्यावर परिणाम होतात. तसेच, औद्योगिक क्षेत्राला वीजपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होतो. मात्र, ‘इलेक्‍ट्रिसिटी ॲक्‍ट २००३’ नुसार ‘सेंट्रल इलेक्‍ट्रिकल ॲथॉरिटी’ यांनी काही नियम घालून दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, ‘इलेक्‍ट्रिकल कॉन्ट्रॅक्‍टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’ या संघटनेतर्फे शुक्रवारी (ता. २६) ‘हार्मोनिक्‍स’ या विषयावर ‘द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स’च्या फिरोदिया सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता कार्यक्रम आयोजित केला आहे. यात दुवेदी हे मार्गदर्शन करणार आहेत. 

प्रदूषणाची उदाहरणे
घरातील प्लगवर कॉम्प्युटर वापरल्यास तो सहा महिन्यांनी काळा पडतो, ट्युबलाइटच्या खाली रेडिओ लावल्यास खरखर आवाज येतो, मिक्‍सर लावल्यावर टीव्हीवरील प्रक्षेपणात व्यत्यय येतो, ही विद्युत प्रदूषणाची उदाहरणे असल्याचे नरेंद्र दुवेदी यांनी सांगितले.