चेहरा हे अभिनेत्याचे भांडवल - जितेंद्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

पुणे - ‘‘आमच्या काळात अभिनेत्याचा चेहरा प्रथम पाहिला जायचा. कारण चेहरा हेच खरे भांडवल होते. अभिनय जमतो का, हे नंतर बघितले जायचे,’’ असे भाष्य अभिनेते जितेंद्र यांनी येथे केले.

पुणे - ‘‘आमच्या काळात अभिनेत्याचा चेहरा प्रथम पाहिला जायचा. कारण चेहरा हेच खरे भांडवल होते. अभिनय जमतो का, हे नंतर बघितले जायचे,’’ असे भाष्य अभिनेते जितेंद्र यांनी येथे केले.

‘पुणे फेस्टिव्हल’मध्ये मल्याळी फेडरेशनच्या वतीने आयोजित ‘केरळोत्सवा’चे उद्‌घाटन जितेंद्र आणि फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर केरळ संस्कृती, कला यांचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवात रंगत गेला. जितेंद्र म्हणाले, ‘‘केरळमधील अनेक जणांचा आणि एकूणच प्रेक्षकांचा आमच्या यशात मोलाचा वाटा आहे. ही भावना आम्ही कधीही विसरणार नाही.’’ कलमाडी म्हणाले, ‘‘पुणे हे ‘कॉस्मोपॉलिटन’ शहर आहे. येथे वेगवेगळ्या समाजाचे लोक एकत्र आनंदाने राहतात.’’ या वेळी युवराज निंबाळकर, फेडरेशनचे अध्यक्ष राजन नायर, उपाध्यक्ष एम. एन. विजयन, सचिव ए. के. जाफर, माजी अध्यक्ष टी. पी. विजयन, केरळी समाजाचे अध्यक्ष मधू नायर, मोहन टिल्लू उपस्थित होते.