गर्ल्स बटालियनला फायरिंगचे धडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

पुणे - राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिराची सुरवात सेनापती बापट रस्त्यावरील ग्रुप हेडक्वार्टर येथे झाली. या शिबिरामध्ये विविध शाळा व महाविद्यालयातील ४०० छात्रांनी सहभाग घेतला आहे. यात थल सैनिक व नौसैनिक विभागाचेही प्रशिक्षण 
सुरू आहे.

या शिबिरात कवायत, नकाशावाचन, आरोग्य आणि स्वच्छतेचे प्रशिक्षण, फायरिंग, बोट पुलिंग, शिप मॉडेलिंग, रिंगिंग, सोलिंग बोट रिगिंग या विषयीचे प्रशिक्षण दिले जात आहे. तर व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण विकास, आपत्ती व्यवस्थापन, स्वसंरक्षणाचे धडे छात्रांना दिले जात असून, तज्ज्ञांची व्याख्यानेही आयोजित केली आहेत. तसेच विविध स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात येत आहेत. हे शिबिर ग्रुप कमांडर बिग्रेडिअर सुनील बोधे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन कॅम्पचे कमांडंट कर्नल ओ. पी. पांडे, डेप्युटी कॅम्प कमांडंट कनकलता चौरे, पामेला पृथ्वी, कॅम्प ॲज्युडंट कॅप्टन काशीफा इनामदार, प्रशिक्षण अधिकारी लेफ्टनंट प्रफुल्लता नांगरे, सांस्कृतिक विभागप्रमुख आशा धेंडे, सुभेदार मेजर रामप्रकाश, जोहरीलाल, लेफ्टनंट (नेव्ही) प्रमोद शिंदे, रिटा खंडागळे हे छात्रांना मार्गदर्शन करत आहेत. हे शिबिर ७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

Web Title: pune news Firing lessons to girls battalion