गणेशोत्सवाच्या खरेदीवर "पाणी' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पुणे - अवघ्या पाच दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी सुटीचे दिवस राखीव ठेवलेल्यांचे रविवारी दिवसभर बरसलेल्या पावसाने नियोजनच कोलमडले. सायंकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यामुळे काही प्रमाणात नागरिकांनी खरेदी केली. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेमध्ये तुरळक गर्दी दिसली. 

दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवाच्या अगोदर येणाऱ्या सुटीच्या दिवशी किंवा रविवारी उत्सवासाठी आवश्‍यक वस्तूंची खरेदी करण्यास नागरिक प्राधान्य देतात. त्यादृष्टीने यंदा गणेशोत्सवासाठी लागणारे आरास, विद्युत रोषणाई, पूजेचे साहित्य, कपडे, मिठाईसह विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी रविवारचा दिवस राखीव ठेवला होता. कोणकोणत्या वस्तू खरेदी करायच्या, त्याची यादीही तयार करून ठेवली होती; परंतु शनिवारी मध्यरात्री सुरू झालेला पाऊस रविवारीही दिवसभर सुरूच राहिल्याने नागरिकांचा खरेदीचा "मूड ऑफ' झाला. 

पावसाने सायंकाळी साडेपाचनंतर काही काळ उघडीप दिल्याने काही प्रमाणात बाजारपेठ फुलली. गर्दी नसल्यामुळे महात्मा फुले मंडई परिसर, तुळशीबाग, बुधवार पेठेतील ध्वनी व विद्युत रोषणाई विक्रेत्यांचाही "मूड ऑफ' झाला होता. 

Web Title: pune news ganeshotsav rain