‘जेनेरिक’ची काही डॉक्‍टरांना ‘ॲलर्जी’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

महापालिकेच्या ड्रग्ज स्टोअर्समध्ये रुग्ण-फार्मासिस्टमध्ये वाद

पुणे - महापालिकेकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यासाठी जेनेरिक औषधांची खरेदी केली असताना काही डॉक्‍टरांकडून जनेरिक औषधे लिहून देण्यात येत नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. डॉक्‍टरांनी लिहून दिलेली औषधे मिळत नसल्याने गाडीखान्यातील सेंट्रल ड्रग्ज स्टोअर्समध्ये महापालिकेचे कर्मचारी आणि फार्मासिस्ट यांच्यात वाद होत असल्याचेही दिसून येत आहे.

महापालिकेने यंदापासून जेनेरिक औषधे खरेदी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. त्यामुळे महापालिकेच्या एकत्रित औषधे खरेदीसह अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजना आणि शहरी गरीब योजनेत जेनेरिक औषधांची खरेदी करण्यात येत आहे. मात्र, खासगी डॉक्‍टर ही औषधे नाकारत असल्याची तक्रार महापालिकेचे कर्मचारी करीत आहेत. महापालिकेत ‘कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीम’ कार्यान्वित आहे. त्या अंतर्गत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातून एक टक्का शुल्क घेतले जाते. त्यातून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना उपचारांचा आणि डॉक्‍टरांनी लिहून दिलेल्या औषधांचा खर्च करता येतो. या वर्षीपासून महापालिकेने जेनेरिक औषधे खरेदीचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे खासगी डॉक्‍टरांनी लिहून दिलेली ब्रॅंडेड औषधे महापालिकेच्या सेंट्रल ड्रग्ज स्टोअर्समध्ये मिळत नसल्याची तक्रार कर्मचारी करत आहेत. त्यामुळे गाडीखाना येथे फार्मासिस्ट आणि कर्मचाऱ्यांत वाद होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरी गरीब योजनेतील औषधेही काही डॉक्‍टर नाकारत असल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे एकीकडे जेनेरिकचा प्रसार करत असतानाच दुसरीकडे डॉक्‍टर मात्र ब्रॅंडेड औषधांवर ठाम असल्याने रुग्णांमध्ये गैरसमज वाढत आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

जबाबदारी आमची नाही 
जेनेरिक औषधे घेतल्यानंतर गुण आला नाही, तर जबाबदारी आमची नाही, अशा शब्दांत खासगी डॉक्‍टर महापालिका कर्मचाऱ्यांना सुनावत असल्याचे येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले. त्यामुळे डॉक्‍टरांनी सांगितलेलीच औषधे मिळावीत, अशी मागणी प्रशासनाकडे करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

शहरी गरीब योजनेतील औषधांना काही डॉक्‍टरांचा नकार
ब्रँडेड औषधांवर काही डॉक्टर ठाम
रुग्णांमध्ये वाढतोय गैरसमज

महापालिकेने जेनेरिक औषधे द्यायला सुरवात केली आहे. जी औषधे जेनेरिकमध्ये उपलब्ध नसतील, तेवढीच ब्रॅंडेड दिली जातील. त्यामुळे योजनांमधील औषधांबाबत तक्रारी येत आहेत.
- डॉ. संजीव वावरे सहायक आरोग्यप्रमुख, महापालिका आरोग्य विभाग

Web Title: pune news geeneric medicine