स्मार्ट मुलीच आता ‘स्मार्ट’ समाज घडवतील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

पुणे - ‘‘मुलींना ‘स्मार्ट’ करण्यासाठी समाजातील सर्व लोकांनी ‘स्मार्ट’ होण्याची आवश्‍यकता आहे. स्मार्ट मुलीच आता स्मार्ट समाज घडवतील,’’ असा विश्‍वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला.

अल्पबचत भवन येथे पुणे जिल्हा परिषद, भारतीय जैन संघटना व सलाम मुंबई फाउंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट गर्ल टू बी हॅप्पी, टू बी स्ट्राँग’ या दोनदिवसीय कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी

तंबाखूमुक्त शाळा अभियानाची घोषणाही करण्यात आली. या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, अनिल शिरोळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा व सलाम मुंबई फाउंडेशनच्या राजेश्री कदम उपस्थित होत्या.

बापट म्हणाले, ‘‘मुलांवर चांगले संस्कार करणे आवश्‍यक आहे. चांगले संस्कार हे मुलांमध्ये चांगला स्वभाव व वागणूक रुजवतात. कुटुंबव्यवस्था कोलमडू देऊ नका, ती टिकवा. ‘स्मार्ट गर्ल टू बी हॅप्पी, टू बी स्ट्राँग’ या अभियानाद्वारे आठवी ते बारावीतील मुलींना सामाजिक आव्हानांना तोंड देण्यास तयार करण्यात येणार आहे.’’

Web Title: pune news girish bapat smart girl