औषधांच्या उपलब्धतेवर परिणाम?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

पुणे - वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर काही औषधांच्या किमती वाढण्याची शक्‍यता गृहीत धरून विक्रेत्यांनी नव्याने औषधसाठा करणे बंद केले आहे. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात औषधांच्या उपलब्धतेवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या संभाव्य तुटवड्यावर मात करण्यासाठी नागरिकांनी जादा औषधे खरेदी करून ठेवण्यास सुरवात केली आहे. नियमितपणे आणि विशिष्ट कंपन्यांच्या तसेच घटकांच्या गोळ्यांच्या बाबतीत नागरिकांकडून अशी काळजी घेतली जात आहे.

‘जीएसटी’ची अंमलबजावणी एक जुलैपासून होणार आहे. औषध निर्माण कंपन्यांसह घाऊक विक्रेत्यांनी त्यासाठीची तयारी सुरू केली आहे. औषधांच्या किमतींवर जीएसटीमुळे नेमका काय परिणाम होईल, त्यांच्या किमती वाढतील की कमी होतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे असले तरी नियमित लागणाऱ्या औषधांचा साठा करून ठेवण्यास नागरिकांनी सुरवात केली आहे.

औषध वितरक रोहित करपे म्हणाले, ‘‘काही औषधांच्या किमती वाढण्याची शक्‍यता आहे. ज्या औषधांवर पूर्वी शून्य टक्के कर होता, त्यावर पाच टक्के कर लागू होणार आहे. पाच टक्‍क्‍यांच्या टप्प्यातील औषधे बारा टक्‍क्‍यांच्या टप्प्यात जाणार आहेत. काही औषधांच्या किमती तीन ते चार टक्‍क्‍यांनी वाढण्याची, तर काही औषधांच्या किमती एक टक्‍क्‍याने कमी होण्याची शक्‍यता आहे; मात्र त्याचे प्रमाण जीएसटी प्रणालीतील इनपूट आणि आउटपूट सेटऑफवर अवलंबून आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जीएसटीची अंमलबजावणी होणार असून त्याबाबत स्पष्टता नसल्यामुळे आम्ही सध्या ‘किमान औषधसाठा’ या तत्त्वावर काम करत आहोत.’’

संभाव्य तोट्यामुळे मागणी कमी
औषधांवर शून्यपासून ते २८ टक्‍क्‍यांपर्यंत ‘जीएसटी’ लागू होणार असून, कोणत्या औषधावर किती कर आहे, याची सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे कंपनीकडून औषधांची मागणी कमी नोंदली जात असल्याचे निरीक्षण औषध विक्रेत्यांनी नोंदविले. करात बदल झाल्यास होणारा संभाव्य तोटा लक्षात घेऊन मागणी कमी होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स

पुणे

नवी सांगवी : पिंपळे गुरव मध्ये गोळीबार झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद उर्फ लल्या...

11.18 AM

नवी सांगवी : "ऐन पावसाळ्यात पिंपळे गुरव परिसरातील कचरा कुंड्या ओसंडून वाहत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण...

11.06 AM

पुणे -  ""सोपं असेल तर ते आयुष्य कसलं...? अडचणी, आव्हानं ही तर हवीतच ! गुळगुळीत रस्ते फार उपयोगाचे नाहीत. रस्त्यात...

05.03 AM