रामटेकडी येथे पिण्याच्या पाण्यात जिवंत अळ्या...

संदीप जगदाळे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

हडपसर (पुणे): रामटेकडी येथे पिण्याच्या पाण्यात जिवंत अळ्या येत आहेत, पाणी दूषित येते आहे. याबाबत आठ दिवसापूर्वी निवेदन देऊनही प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर महिला विभागाने धरणे आंदोलन केले.

हडपसर (पुणे): रामटेकडी येथे पिण्याच्या पाण्यात जिवंत अळ्या येत आहेत, पाणी दूषित येते आहे. याबाबत आठ दिवसापूर्वी निवेदन देऊनही प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर महिला विभागाने धरणे आंदोलन केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर महिला अध्यक्षा शशिकला वाघमारे म्हणाल्या, 'रामटेकडी येथे एकाच ठिकाणाहून सांडपाणी व जल वाहिन्या गेल्या आहेत. त्या नादूरूस्त व जिर्ण झाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही पाणी एकमेकात मिसळत आहे. त्यामुळे दुर्गंधीयुक्त व आळ्यायुक्त पाणी नळाला येत आहे. याबाबत आठ दिवसापूर्वी वानवडी-रामटेकडी सहाय्यक आयुक्त कार्यालयात निवेदन देवूनही कोणतीही उपाययोजना झाली नाही, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.'

रामटेकडी अण्णाभाऊ साठे उद्यानात हे आंदोलन महिलांच्यावतीने करण्यात आले. यावेळी पुणे शहर महिला अध्यक्षा शशिकला वाघमारे, वैशाली शिंदे, हडपसर विधानसभा अध्यक्ष संतोष खरात, प्रज्ञा गायकवाड, पुणे शहर अध्यक्ष शशिकला वाघमारे, हडपसर विधानसभा अध्यक्ष संतोष खऱात, वैशाली शिंदे, प्रज्ञा गायकवाड, वंदना जगताप, मीना गालटे, प्रिया जावळे, छाया ससाणे, अशा सावंत, शांता गवळी, छाया बोरूडे, प्रभा वाघचौरे, सुनिता सोणवणे उपस्थित होते.

याबाबत सहाय्यक आयुक्त संजय गावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'येथील जल व सांडपाणी वाहिन्या जून्या व जिर्ण झाल्या आहेत. तसेच नागरिकांनी या वाहिन्यांची जागोजागी तोडफोड केली आहे. तसेच जागा अपुरी असल्याने कामगारांना काम करण्यासाठी देखील येथे अडथळा होत आहे. आमचे अभियंते याबाबत पहाणी करून आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत. मात्र, नागरिकांनी देखील जलवाहिन्या व सांडपाणी वाहिन्या तोडू नयेत. नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास हे काम तातडीने पूर्ण करता येईल.'

हडपसर परिसरात डेगींसारख्या साथीच्या आजारपणामुळे नागरिक हैरान झाले आहेत. त्यामध्येच दूषीत पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येऊन उभा राहिला आहे. रामटेकडी पंचशिल नगर येथे आज दुपारी नळाला पाणी आले. पाणी येत असताना त्यासोबत नळातून काळया रंगाच्या अळ्या बाहेर पडत होत्या. नक्की काय पडते याची पाहणी केली तर उड्या मारणाऱ्या जिवंत अळ्या आढळून आल्या. त्यामुळे प्रशासनाने तात़डीने उफाययोजना न केल्यास आंदोलन तिव्र करण्यात येईल.