'आरोग्यसेवेसाठी सुसंवाद महत्त्वाचा'

'आरोग्यसेवेसाठी सुसंवाद महत्त्वाचा'

पुणे -  "चांगल्या आरोग्यसेवेसाठी रुग्ण व नातेवाईक, स्थानिक पोलिस, वकील यांच्याशी डॉक्‍टर व रुग्णालयांच्या व्यवस्थापनाने सुसंवाद ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर रुग्णाचे दस्तावेज आणि सर्व आवश्‍यक कागदपत्रांच्या नोंदी असतील, तर पोलिसांपासून तुम्हाला संरक्षण मिळू शकते आणि तुम्ही अधिक सक्षम आरोग्यसेवा पुरवू शकता,' असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विपिन चेकर यांनी केले. 

लेवा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर (एलसीसीआयए) तर्फे पुण्यातील हॉटेल जेडब्ल्यू मेरियट येथे आयोजित "हेल्थकेअर'वरील परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी "पोलिसांच्या फोननंतर पुढे काय?' या विषयावर डॉ. चेकर बोलत होते. डॉ. विश्वनाथ कोल्हे, डॉ. सुभाष चौधरी, डॉ. उल्हास पाटील, एलसीसीआयए कोअर कमिटीचे अध्यक्ष रवींद्र चौधरी, उद्योजक कुंदन ढाके, मिलिंद चौधरी, वासू पाटील, गौरव अतरदे, प्रशांत चौधरी, डॉ. पवन भोळे, एलसीसीआयए हेल्थकेअरचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र पाटील, डॉ. संदीप भिरूड, डॉ. राहुल चौधरी, डॉ. विवेक नेमाडे, डॉ. भूषण जावळे, स्वप्नील भोळे, डॉ. रत्नप्रभा चौधरी उपस्थित होते. 

डॉ. चेकर म्हणाले, ""एखाद्या प्रकरणात पोलिसांचा फोन आल्यास आपण घाबरून जातो; मात्र आपले स्थानिक पोलिसांशी चांगले संबंध असतील आणि कागदपत्रे व्यवस्थित असतील, तर घाबरण्याचे कारण नाही. पोलिसांच्या फोननंतर न घाबरता धैर्याने सामोरे जावे. सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवावेत. सुरक्षेची काळजी घ्यावी.'' सीड इन्फोटेकचे संचालक नरेंद्र बऱ्हाटे म्हणाले, ""रुग्णालय व्यवस्थापन, डॉक्‍टर आणि रुग्ण या तीनही घटकांसाठी माहिती तंत्रज्ञान उपयुक्त आहे. आरोग्यसेवा क्षेत्रवाढीबरोबरच अलीकडे स्वयंचलन (ऑटोमेशन) महत्त्वाचे ठरत आहे.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com