बैलगाडा शर्यतीबाबत उच्च न्यायालयाची बंदी कायम

डी. के. वळसे पाटील
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

मंचर (पुणे) : बैलगाडा शर्यतीबाबत आज (बुधवार) मुंबई येथे उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. राज्य सरकार बैलगाडा शर्यती बाबत नियम अटी प्रसिध्द करु शकते, पण बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्य न्यायालयाने २०१४ च्या निकालात बैल प्राणी पळू शकत नाही, असा निकाल दिलेला आहे. त्यामुळे उच्च न्यायालय या बाबत निर्णय देवू शकत नाही, असे म्हणत आज उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यती बंदच ठेवा असे आदेश दिले.

याबाबत सरकारला सर्वोच्य न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले. बैलगाडा शर्यतीबाबत सरकारच्या वतीने प्रसिध्द जेष्ठ विधी तज्ञ अॅस्पी चिनाय यांनी यांनी ३५ मिनिट जोरदार युक्तीवाद केला. "विधानमंडळाला कायदा करण्याचा अधिकार असुन नियम अटी प्रकाशित करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शासन नियम अटी प्रकाशित करेल." असे अॅड चिनाय यांनी सांगीतले. याबाबत न्यायालय म्हणाले की, सरकार नियम अटी प्रकाशित करु शकते पण सर्वोच्य न्यायालयाने बैलगाडा शर्यतीबाबत काही आक्षेप घेतल्याने आपण सर्वोच्य न्यायालयात दाद मागू शकता. असे सांगीतले. राज्य सरकार व अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना उच्च न्यायालयाच्या या निर्णया विरोधात सर्वोच्य न्यायालयात अपील करणार आहे, असे पुणे येथील अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेचे संदीप बोदगे यांनी सांगितले.