माझ्या प्रत्येक गाण्यात "त्यांची' सावली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पुणे - ""ज्यांच्यामुळे मला गायक-संगीतकार ही ओळख मिळाली, ज्यांच्यामुळे मी आज इथवर आलो, "भावगंधर्व' पदवीपासून "पद्मश्री'पर्यंतचे सन्मान मिळाले, असे माझे वडील मास्टर दीनानाथ यांची सावली माझ्या प्रत्येक गाण्यात असते. त्यांची आठवण आज जास्तच येत आहे,'' अशा भावना संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केल्या. 

पुणे भारत गायन समाजाचा पं. राम मराठे स्मृती पुरस्कार संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना पं. शंकर अभ्यंकर यांचा हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी गायक पं. सत्यशील देशपांडे, संगीत संयोजक अमर हळदीपूर, संस्थेच्या अध्यक्ष शैला दातार उपस्थित होत्या. 

मंगेशकर म्हणाले, ""संगीत क्षेत्रात वेगळा ठसा उमटवलेले राम मराठे यांच्या नावाचा पुरस्कार मिळावा, हा कुठल्याही गायकाच्या आयुष्यात आनंदाचा आणि भाग्याचा क्षण असतो. या पुरस्कारासाठी मी योग्य आहे की नाही, हे माझे गाणेच ठरवेल.'' 

"मराठे यांना गाताना ऐकले आहे. विलक्षण तान त्यांच्याकडे होती. मला वेगवेगळ्या गायकांचे गाणे ऐकायला आवडते. चांगले असले तर ते गाणे पुनःपुन्हा ऐकतो, असेही ते म्हणाले. 

अभ्यंकर म्हणाले, ""हृदयनाथ मंगेशकर हे संगीतातील एक अवलिया माणूस आहेत. मा. दीनानाथांप्रमाणेच ते स्वयंभू आहेत. त्यांच्या रचना मन थक्क करणाऱ्या, अद्भुत आहेत. त्यांनी स्वतःची वेगळी वाट निर्माण केली आहे. असे गायक पुढे निर्माण होतील की नाही याबाबत मनात शंका आहे.'' देशपांडे म्हणाले, ""अभिजात आणि सुगम यांच्यात विनाकारण द्वंद्व निर्माण केले जाते; पण या पुरस्कारामुळे त्या कल्पनेला तिलांजली मिळाली, असे वाटते.'' 

दरम्यान, दृकश्राव्य माध्यमातून लता मंगेशकर यांनीही रसिकांशी संवाद साधला. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. शिल्पा पुणतांबेकर यांनी आभार मानले.