'त्या' बोगद्यातील अपघातामध्ये काझडच्या युवकाचा मृत्यू...

राहुल नरुटे
राहुल नरुटे

वालचंदनगर : काझड (ता. इंदापूर) येथील राहुल सुग्रीव नरुटे (वय - २२) या युवकाचा बोगद्यातील आपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली. उर्वरित सातजण परराज्यातील युवक आहेत. इंदापूर तालुक्यामध्ये अकोले, काझड परिसरामध्ये नीरा - भीमा नदीजोड प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरु आहे. बोगद्यामध्ये बहुतांश परराज्यातील नागरिक काम करत आहेत. स्थानिक कामगारांची संख्या अत्यंत कमी आहे. मोजकेच स्थानिक नागरीक बोगद्याच्या वरच्या बाजूला काम करत आहेत.

बोगद्यापासुन अगदी जवळ राहण्यासाठी असलेला राहुल सुग्रीव नरुटे हा गेल्या दीड महीन्यापासुन पंप अॉपरेटर म्हणुन कामाला लागला होता. दररोज सकाळी आठ वाजता कामावरती जाणे व पाच साडेपाच वाजता काम संपल्यानंतर घरी येणे असा त्याचा दिनक्रम होता. सोमवार ( ता. ३० ) रोजी बोगद्यामध्ये कामामध्ये अचानक अडचण आल्याने नरुटे याच्यासह दोन क्रेन अॉपरेटर , तीन सुपरवायझर व दोन कामगार बोगद्यामध्ये उतरले होते. काम आटोपून बाहेर येत असताना अचानक क्रेनचा रोपवे तुटल्याने अपघात झाला.

या अपघातामध्ये इतर सात कर्मचाऱ्यांसह नरुटे हा युवकाचाही जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्याची बातमी काही क्षणामध्ये तालुक्यामध्ये पसरली. नरुटे यांच्या कुटुंबातील सदस्य ही बोगद्यावरती त्वरीत हजर झाले. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी तुमचा मुलगा आतमध्ये गेला नसल्याचे सांगत होते. सात कामगारांचे मृतदेह बाहेर आणले होते. यामध्ये राहूलचा समावेश नव्हता. शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला तो राहुलचा होता. मृतदेह पाहताच कुटुंबातील सदस्यांनी टाहो फोडला. क्षणामध्ये होत्याचे नव्हते झाले होते. आज इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांनी नरुटे कुटुंबियांची भेट घेऊन जास्तीत जास्त शासकिय निधी मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com