भारत-पाक सामन्यावर बेटिंग खेळणाऱ्या 5 जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

पुणे : चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यावर सट्टेबाजी (बेटिंग) खेळणाऱ्या पाचजणांना अटक करण्यात आली.

पुणे : चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यावर सट्टेबाजी (बेटिंग) खेळणाऱ्या पाचजणांना अटक करण्यात आली.

गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने वानवडी येथील अश्विनी पॅलेसमध्ये छापा टाकला. आरोपींच्या ताब्यातून लॅपटॉप, 11 मोबाईल आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिताराम मोरे यांनी ही कारवाई केली.