बिबट्याच्या दोन बछड्यांचा उसाच्या आगीत जळुन मृत्यु

पराग जगताप
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

सध्या वीज वितरण कंपनीचा सुरक्षा सप्ताह सुरु असल्याने वीजवाहक खांबांवर लावल्या जाणाऱ्या फ्लेक्स अथवा अन्य फलकांमुळे दुर्घटना घडत असल्याचे निवेदन वीज कंपनीला जुन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काजळे यांनी दिले होते. विजेच्या अशा घटना घडत झालेल्या हानीबद्दल काजळे यांनी नाराजी व्यक्त केली

ओतूर ता.जुन्नर - जुन्नर तालुक्यातील ओझर येथे राजेंद्र जगदाळे यांच्या ऊसाच्या शेताला लागलेल्या आगीत बिबट्याची दोन पिले मृत्यूयुमुखी पडल्याची घटना घडली. विजवाहक तारा पडून ही आगीची घटना घडली होती. ही दोन्ही पिल्ले एक महिन्याच्या मादी असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  ओझर येथे जगदाळे मळ्यातील राजेंद्र जगदाळे यांच्या ऊसाच्या शेताला विजवाहक तारा पडून शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे ही आग लागली व त्यात बिबट्याची दोन पिले मृत झाली. या घटनेची माहीती तातडीने स्थानिक नागरिक सुनिल कवडे यांनी वनविभागाला कळवली असता वनपाल मनीषा काळे, वनरक्षक कांचन ढोमसे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पशुवैद्यकीय अधिकारी संजय कुमकर यांनी या पिलांचे शवविच्छेदन केले. हिवरे येथील गिब्सन पार्क मध्ये येथे बछड्यांचे दहन करण्यात आले. दरम्यान सध्या वीज वितरण कंपनीचा सुरक्षा सप्ताह सुरु असल्याने वीजवाहक खांबांवर लावल्या जाणाऱ्या फ्लेक्स अथवा अन्य फलकांमुळे दुर्घटना घडत असल्याचे निवेदन वीज कंपनीला जुन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काजळे यांनी दिले होते. विजेच्या अशा घटना घडत झालेल्या हानीबद्दल काजळे यांनी नाराजी व्यक्त केली.  

रात्री एक बछडा उसात अजुन जळालेला व मृत सापडला असुन मादी बिबट्या त्या परिसरात फिरत असल्याने वनविभागाने खबरदारीचा उपाय म्हणुन तो तीसरा मृत बछडा  रात्री ताब्यात घेतला नाही.

Web Title: pune news junnar leopard