‘कजरा मोहब्बतवाला’ने रसिक मंत्रमुग्ध

‘कजरा मोहब्बतवाला’ने रसिक मंत्रमुग्ध

पुणे - बाहेर पावसाच्या बरसणाऱ्या सरी आणि सभागृहात गायिकांच्या सदाबहार द्वंद्व गीतांचे सादरीकरण, ‘कजरा मोहब्बतवाला’ अशा सदाबहार हिंदी गाण्यांद्वारे सिनेसंगीताच्या सुवर्णकाळाची सफर रसिकांना अनुभवता आली. 

निमित्त होते ‘कजरा मोहब्बतवाला’ या संगीतमैफलीचे. सूरसखी मंचातर्फे ‘श्वेता असोसिएशन’तर्फे पांढरे डाग असलेल्या व्यक्तींच्या स्वमदत गटाला मदत मिळावी, यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. 

या वेळी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आयएएस अधिकारी लतिका पडळकर, लेखिका वीणा देव, गायिका अनुराधा मराठे, प्राज फाउंडेशनच्या परिमल चौधरी, आमदार मेधा कुलकर्णी, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, खासदार वंदना चव्हाण, संशोधक डॉ. पारुल गंजू, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे या नऊ महिलांचा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. माया तुळपुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

डॉ. तुळपुळे यांनी असोसिएशनच्या वधू-वर मंडळ, नोकरी सहायता केंद्र, मॅरेथॉन, डाग झाकणारा प्रसाधने, फोटोथेरपी, नितळ चित्रपटनिर्मिती उपक्रमांबाबत माहिती दिली; तसेच पांढरे डाग असणाऱ्या व्यक्तींना अजूनही बऱ्याच प्रमाणात सामाजिक अवहेलनेचा सामना करावा लागतो आहे, अशी खंतही व्यक्त केली.

कार्यक्रमात मानिनी गुर्जर, अनुराधा पटवर्धन आणि मेघना सहस्रबुद्धे यांनी गाणी सादर केली. शुभदा आठवले, किमया काणे, ऊर्मिला भालेराव, शिल्पा आपटे आणि उमा जठार यांनी साथसंगत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com