राळेगण: बिबट्याकडून शेळ्या फस्त; स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

leopard-attack
leopard-attack

राळेगण - येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना पहाटे तीनच्या सुमारास घडली. येथील विष्णू बबन शिंदे यांच्या मालकीच्या या शेळ्या होत्या. बिबट्याने हल्ला केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. 

राळेगण येथील विष्णू शिंदे यांच्या घराजवळ असणाऱ्या गोठयात पहाटे तीनच्या सुमारास घुसून बिबट्याने शेळ्यांचा फडशा पाडला. एका शेळीला घराजवळ मारले तर दुसरीला घरापासून अंदाजे चारशे फूट अंतरावर असणाऱ्या आंब्याच्या बागेत फरफटत नेले व मारले. वनविभागाचे कर्मचारी रमेश खरमाळे, वनपाल डी डी साळुंके व सागर चुटके यांनी या घटनेचा पंचनामा केला.

बिबट्याच्या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिक भीतीच्या छायेत असल्याने वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी राजू उंडे, चंद्रकांत उंडे, सिताराम सोनवणे, अशोक उंडे यांनी केली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता बिबट्या दिसल्यास तातडीने वनविभागाशी सम्पर्क साधावा. तसेच योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन वनरक्षक रमेश खरमाळे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com