मधुरांगणचे सभासद होऊन मिळवा "स्कॅन टू सेव्ह' तंत्रज्ञान भेट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

पुणे - संपूर्ण वर्षभर नाटक, गाणी, गरबा, मेंदी, पाककृती, आरोग्यविषयक कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या "मधुरांगण' परिवारात सहभागी होण्याची संधी आहे. जे सभासद होतील, त्यांना लाखमोलाचा जीव वाचवणारं "स्कॅन टू सेव्ह' तंत्रज्ञान भेट मिळणार आहे. 

पुणे - संपूर्ण वर्षभर नाटक, गाणी, गरबा, मेंदी, पाककृती, आरोग्यविषयक कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या "मधुरांगण' परिवारात सहभागी होण्याची संधी आहे. जे सभासद होतील, त्यांना लाखमोलाचा जीव वाचवणारं "स्कॅन टू सेव्ह' तंत्रज्ञान भेट मिळणार आहे. 

अपघातग्रस्त व्यक्तीची ओळख न पटल्याने, त्यावर उपचार करता येत नाहीत. त्यामुळे अनेकांचा मृत्यू होता. तसेच लहान मुले हरवल्यानंतर त्यांचा शोध घेणे अवघड असते. या दोन्ही समस्यांचा अभ्यास करून पार्टिसिपंट बिझनेस सोल्युशन प्रा. लि. या कंपनीने "स्कॅन टू सेव्ह' हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या किटमध्ये कस्टमाइझ्ड क्‍यू आर कोड स्टिकर आहे. ज्यामध्ये संबंधित व्यक्तीची संपूर्ण वैद्यकीय माहिती अंतर्भूत असेल. तसेच एक क्‍यू आर कोड वॉलेट कार्ड, कस्टमाइझ्ड क्‍यू आर कोड किचेन आणि ऍक्‍टिव्हेशन गाइडचाही समावेश आहे. क्‍यू आर बेस्ड स्टिकर्स, वॉलेट कार्ड, टॅग, क्‍लोदिंग पॅचेस, किचेन, शू टॅग इत्यादी प्रोडक्‍ट्‌स अगदी सहजपणे स्वत:जवळ बाळगता येत असल्याने, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळू शकते. "स्कॅन टू सेव्ह'मुळे संबंधित व्यक्तीचे ठिकाण समजते, तसेच वैद्यकीय माहिती उपलब्ध होऊन उपचार करता येतात. बाजारामध्ये रु. 365 ला उपलब्ध होणारे हे प्रॉडक्‍ट "मधुरांगण' सभासदांना भेट मिळणार आहे. तर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना सवलतीत मिळेल. 

- खास राखी पौर्णिमेनिमित्त अरिहंत इव्हेंट्‌सतर्फे "राखी मेला 2017'चे बुधवारी (ता. 26) सकाळी 11 ते रात्री 9 वा ओसवाल बंधू समाज, सेव्हन लव्हज चौक, पुणे येथे आयोजन. 
- आजच्या राखी मेला प्रदर्शनात जे सभासद होतील; तसेच लकी ड्रॉ विजेत्यांना "चांगल्या बायका दुसऱ्याच्या' या नाटकाच्या प्रवेशिका भेट. 
- मनीषा जैन यांचे नेल आर्ट व ज्वेलरी मेकिंग विनामूल्य मार्गदर्शन दुपारी 2 वाजता. 
- "चांगल्या बायका दुसऱ्याच्या' या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक आनंद म्हसवेकर असून, संतोष पवार व स्मिता दोंदे हे कलाकार आहेत. या नाटकात आपल्या बायकोपेक्षा दुसऱ्यांच्या बायका जास्त गुणसंपन्न वाटतात. त्यामुळे संसारात काय घडतं, हे मनोरंजन करून हसवणारं अन्‌ डोळ्यांत अंजन घालणारं धमाल कॉमेडी नाटक आहे. 
- या नाटकाची एक प्रवेशिका भेट. (स्टॉक असेपर्यंत) 

- हजारो रुपयांचे "फ्री व्हाउचर' 
- वार्षिक सभासदत्व शुल्क अवघे रुपये 999. 
- नोंदणीनंतर सभासदांना "तनिष्का'च्या 12 अंकांसहित 1 हजार 499 रुपये किमतीचा 23 पिसेसचा मल्टिपर्पज सेट भेट. 
(भेटवस्तूसाठी कृपया मोठी पिशवी आणावी.) 
- नामवंत ब्रॅंड्‌सची हजारो रुपयांची फ्री गिफ्ट व्हाउचर व डिस्काउंट व्हाउचर भेट 
- ऑनलाइनसाठी प्ले स्टोअरवर madhurangan टाइप करा, ऍप डाउनलोड करून सदस्यत्व नोंदणी शक्‍य. पासवर्ड 6 ते 7 डिजिटचा असावा. 
- कुरिअरचा ऑप्शन निवडून सभासदत्व आणि कुरिअरची रक्कम ऑनलाइन भरल्यास गिफ्ट व इतर सर्व साहित्य घरपोच 
- ऍपवरून नोंदणी करणाऱ्या सभासदांना सर्व भेटवस्तू 15 दिवसांनंतर मिळतील; अन्यथा "सकाळ'च्या बुधवार पेठ किंवा पिंपरी कार्यालयात आधी संपर्क साधून (सकाळी 11 ते सायं. 6) या वेळात भेटवस्तू नेता येतील. 
- ऍपव्यतिरिक्त नोंदणीसाठी - "सकाळ' मुख्य कार्यालय, 595, बुधवार पेठ, पुणे किंवा "सकाळ' पिंपरी कार्यालय सनशाइन प्लाझा, हॉटेल रत्नाच्यामागे, पिंपरी (सकाळी 11 ते सायं. 6) 
- अधिक माहितीसाठी संपर्क : 8378994076 किंवा 9075011142