महम्मद रफींच्या गीतांनी रंगली मैफल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

पुणे - महम्मद रफी आर्टस फाउंडेशनतर्फे आयोजित महम्मद रफी यांच्या ३७ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित १८ व्या ‘अंदाज ए रफी’ या सांगीतिक मैफलीस पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमानिमित्त धायरी येथील ज्ञानगंगोत्री मतिमंद विद्यालयास कृतज्ञता मदत निधी देण्यात आला.

फाउंडेशनच्या वतीने ‘अंदाज ए रफी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी राज्य गुप्तवार्ता विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रशेकर दैठणकर, कारागृह विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, पोलिस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी, ॲड. प्रताप परदेशी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे, राकेश पौडवाल, कवी अनिल गुंजाळ व फाउंडेशनचे अध्यक्ष इक्‍बाल दरबार उपस्थित होते. ज्ञानगंगोत्री विद्यालयास देण्यात आलेला निधी संस्थेचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्त्या रूपाली चाकणकर, विक्रम कसबे व भावना कसबे यांनी कृतज्ञता मदत निधी स्वीकारला. 

दरबार म्हणाले, ‘‘महम्मद रफी यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोलाचे योगदान दिले. त्याचबरोबर कायम माणुसकीला प्राधान्य देत सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यामुळेच संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या सांगीतिक व सामाजिक कार्याला अभिवादन करण्यासाठी मागील १८ वर्षांपासून हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.’’

‘ऑर्केस्ट्रा गॉड गिफ्ट’तर्फे रफी यांची जुनी व दुर्मिळ गीते सादर करण्यात आली. जहीर दरबार, जमीर दरबार, आवेज दरबार, माधुरी भोसेकर, मनीषा लताड, अनिल गोडे, नीळकंठ कुलकर्णी आदींनी गायन केले. सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले. तर आभार सुभाष मोहिते यांनी मानले.