आदर्श गावांसाठी आता 5 लाखांचा पुरस्कार : पोपटराव पवार

आदर्श गावांसाठी आता 5 लाखांचा पुरस्कार : पोपटराव पवार

मंचर : आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजने अंतर्गत सन २००९ -१० पासून सहभाग घेत असलेल्या उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गावांना प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण संस्था, ग्रामकर्ता व ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांना शासनाच्या वतीने महाराष्ट्र आदर्श गाव भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.  उत्कृष्ट आदर्श गावासाठी पाच लाख रुपये रोख रक्कम स्मृती चिन्ह व सन्मान पत्र दिले जाणार आहे, अशी माहिती आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदर्शगाव योजनेचे अध्यक्ष व जलसंधारण मंत्री राम शिंदे, आदर्श गाव योजनेचे उपाध्यक्ष व जलसंधारण राज्य मंत्री विजय शिवतारे, जलसंधारणचे सचिव एकनाथ डवले यांच्या पुढाकारामुळेच प्रथमच आदर्शगाव भूषण पुरस्कार आदर्शगावांना दिले जात आहेत. राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाने नुकताच याबाबतचा अध्यादेश काढलेला आहे. उत्कृष्ट आदर्शगावासाठी व्दितीय क्रमाकासाठी तीन लाख रुपये व तृतीय क्रमांकासाठी दोन लाख रुपये, उत्कृष्ट प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण संस्थेला प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये द्वितीय ५० हजार रुपये व तृतीय : वीस हजार रुपये, उत्कृष्ट ग्राम कार्यकर्ता प्रथम : २५ हजार रुपये द्वितीय १५ हजार, तृतीय : दहा हजार रुपये, ग्राम स्थरीय प्रशासकीय अधिकारी यांना एक ते तीन क्रमांकासाठी रक्कम स्मृती चिन्ह व सन्मान पत्र दिले जाणार आहे.  

आदर्श गाव भूषण पुरस्कारासाठी पात्रतेच्या अटीची पूर्तता करीत असलेल्या संबधीतानी कार्यकारी समितीने विवित केलेल्या नमुन्यातील प्रपत्रात माहिती भरून एकत्रित अर्जाचा प्रस्ताव गावाच्या ग्रामसभेत सादर करावा. ग्रामसभेची मान्यता मिळाल्यास सदर प्रस्ताव ग्रामपंचायती मार्फत जिल्हा स्तरीय समितीकडे मान्यता व शिफारसीसाठी पाठवावा. 

जिल्हास्तरीय समिती शहानिशा व गुणांकन करून योग्य त्या शिफारशीसह पात्र प्रस्ताव राज्य स्तरीय कार्यकारी समितीकडे पाठवील. त्यानंतर तांत्रिक समितीकडून प्रस्ताव पडताळणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुणानुक्रमे पात्र ठरलेल्या गावांना राज्यस्तरीय कार्यकारी समिती गावांना प्रत्यक्ष भेट देऊन शहानिशा करेल. त्यानंतर पुरस्कार निवड करेल. असे पवार यांनी सांगितले.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com