मेट्रो स्थानकासाठी ‘संरक्षण’कडे पाठपुरावा

मेट्रो स्थानकासाठी ‘संरक्षण’कडे पाठपुरावा

पुणे - खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील खडकी रेल्वे स्थानक व रेंजहिल्स येथील मेट्रो स्थानकांसाठी आवश्‍यक जमीन देण्याचा प्रस्ताव कॅंटोन्मेंट बोर्डाने लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडे पाठविला आहे. याबाबत संरक्षण मंत्रालयच निर्णय देईल, अशी भूमिका लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाने घेतल्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत हा प्रश्‍न संरक्षण मंत्रालयासमोर मांडण्यात येणार आहे.

महापालिकेने मेट्रो स्थानकासाठी खडकी रेल्वे स्थानक व रेंजहिल्स येथे जागा सुचविली आहे. याबाबतचे काम कोणत्या टप्प्यावर आहे, असा प्रश्‍न आमदार विजय काळे यांनी बैठकीत उपस्थित केला असता बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर धीरज मोहन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘मेट्रो स्थानकाच्या दोन्ही जागा लष्कराच्या हद्दीत येतात. कॅंटोन्मेंटने याबाबतचा प्रस्ताव तयार करून लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडे पाठविला आहे. मात्र त्यांनी यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाकडूनच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे.’’

काळे म्हणाले, ‘‘मेट्रोची दोन्ही स्थानके लष्कराच्या जागेत होणार आहेत. जागा देण्याबाबत लष्कराच्या दक्षिण मुख्यालयास काही तांत्रिक अडचण येत असल्याने हा प्रश्न मुख्यमंत्र्यांद्वारे संरक्षण मंत्रालयापुढे मांडू.’’
 

सीसीटीव्ही बसवा
कॅंटोन्मेंटच्या आठही वॉर्ड सदस्यांनी आपल्या वॉर्डामध्ये विजेचे खांब, बल्ब नसल्याची तक्रार उपाध्यक्ष अभय सावंत यांच्यासह सदस्य मनीष आनंद, पूजा आनंद, सुरेश कांबळे, कार्तिकी हिवरकर यांनी केली. आवश्‍यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे दुर्योधन भापकर यांनी सांगितले. त्यावर ब्रिगेडिअर मोहन व मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप यांनी हे काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com