सरकारकडून धनगर समाजाची फसवणूक - गणपतराव देशमुख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

पुणे - राज्य मंत्रिमंडळातील एका ज्येष्ठ नेत्याने कायद्यात दुरुस्ती न करताच सोलापूर विद्यापीठाला "पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर' यांचे नाव देण्याची घोषणा केली. त्यामुळे सरकारकडून धनगर समाजाची फसवणूक केली जात असल्याची टीका डॉ. आमदार गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केली. 

शनिवारवाडा पटांगणात आयोजित "धनगर माझा' सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार रामराव वडकुते, ऍड. रामहरी रूपनवर, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी आमदार पोपटराव गावडे, गोपीचंद पडळकर, उत्तम जानकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

आमदार देशमुख म्हणाले, ""धनगर आरक्षणाच्या मागणीचा पाठपुरावा राज्य सरकारकडे करीत राहणार आहे. माझे उरलेले आयुष्य राज्यातील दुष्काळ हटवण्यासाठी आणि धनगर आरक्षण मिळण्यासाठी घालवेन.'' 

या वेळी अन्य मान्यवरांनी मनोगतपर भाषणे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय तानले यांनी, तर गणेश खामगळ यांनी आभार व्यक्त केले.

Web Title: pune news MLA ganpatrao deshmukh Dhangar community