खासदार सुप्रिया सुळे यांचा खड्ड्यासोबत सेल्फी

राजेंद्रकृष्ण कापसे
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

राज्यात एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्डे नाहीत. खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. त्या खडयामुळे हकनाक गेलेले बळी याला जबाबदार कोण? राज्यातील सर्व रस्त्यावर सर्वत्र हेच चित्र आहे.

पुणे : पुण्यातील कात्रज ते उंड्री बायपास आणि बोपदेव घाट परिसरातील खड्यासोबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सेल्फी काढून ते सोशल मीडियावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना सोशल मीडियावर टॅग केले आहेत. 

राज्यात एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्डे नाहीत. खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. त्या खडयामुळे हकनाक गेलेले बळी याला जबाबदार कोण? राज्यातील सर्व रस्त्यावर सर्वत्र हेच चित्र आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्रीमहोदय मात्र 'खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा' अस आवाहन करताय. म्हणून त्यांच्या आवाहनाला आवाहनाला भरभरून प्रतिसाद देण्यासाठी खड्डे असलेले रस्ते त्यांना दाखवून देऊ या. मी सुरुवात केली आहे, तुम्ही करताय ना? असे म्हणत कात्रज ते उंड्री व बापदेव घाट रस्त्यावरील काढून ते #Selfieswithpotholes असे ते फोटो सोशल मीडिया वरून मंत्री महोदयांना टॅग केले आहेत.