पिंपरी सांडसमधील खून मित्राने केल्याचे उघड 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

वाघोली - पिंपरी सांडस (ता. हवेली) येथे तीन नोव्हेंबर रोजी झालेल्या खुनाचा तपास लावण्यात लोणीकंद पोलिसांना यश आले आहे. बदनामी केल्यामुळेच आपली नोकरी गेली, हा राग मनात धरून मित्रानेच हा खून केला. या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. 

दिनेश वैजनाथ ढेपे (वय 23, रा. चंदननगर, मूळ रा. पारा, जि. उस्मानाबाद ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्ल्यात  विश्वजित शिवाजी कुदळे हा जखमी झाला होता. या प्रकरणी नीलेश बाळासाहेब रणसिंग (रा. लोहगाव, मूळ रा. नगर) व बबन दत्तात्रय साबळे (रा. तांदळी, जि. नगर) यांना अटक केली आहे. 

नीलेश रणसिंग हा हडपसर येथील पोल्ट्री कंपनीत चालक म्हणून नोकरीस होता; तर तेथेच दिनेश हा काम करीत होता. त्यांच्यात काही कारणावरून पूर्वी वाद झाले होते. कंपनीने नीलेशला नोकरीवरून कमी करून, त्या जागी दिनेशला घेतले. यामुळे नीलेशचा दिनेशवर राग होता. त्यातूनच नीलेशने हा खून केला. पोलिसांनी नीलेशला लोहगाव येथून तर बबनला नगर येथून ताब्यात घेतले.  न्यायालयाने दोघांना 14 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.