चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

पुणे - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना कात्रज येथील संतोषनगर परिसरात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. त्यांचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केली आहे. 

ऋतुजा दीपक जाधव (वय 18) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती दीपक शिवाजी जाधव (वय 23, रा. संतोषनगर, कात्रज, मूळ रा. बोरिवली, मुंबई) याला अटक केली आहे. याप्रकरणी ऋतुजाची आई माया गोळे (वय 38, रा. शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली. 

ऋतुजा आणि दीपकचा 23 मे 2017 रोजी विवाह झाला होता. हे दांपत्य संतोषनगर भागात राहत होते. ऋतुजा काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. त्या वेळी तिने पतीकडून मारहाण होत असल्याचे आईला सांगितले. त्या वेळी त्यांनी ऋतुजाला समजावून सांगितले. त्यानंतर तिची आई तिला भेटण्यासाठी कात्रज येथे जात असे. मात्र, तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर ती काही बोलत नव्हती. त्यानंतर 18 जुलै रोजी दोघे जण शिवाजीनगर येथील घरी गेले. तेथे 25 जुलैपर्यंत राहून कात्रज येथील घरी परतले. त्या वेळी कात्रज पीएमपी बसस्थानकावर एकाचा धक्का लागल्याच्या कारणावरून दीपक याला अनोळखी मुलांनी मारहाण केली. त्यावर दीपकने "ही मुले तुझ्याच ओळखीची असून, त्यामुळेच त्यांनी मला मारहाण केली,' असा आरोप केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चहावरून त्यांच्यात वाद झाला. त्या वेळी रागाच्या भरात त्याने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तो पसार झाला. बुधवारी रात्री तो हडपसर परिसरात दारूच्या नशेत आढळून आल्याचे समजले. त्या वेळी ऋतुजाची आई आणि भाऊ हडपसर येथे गेले. त्यांनी मुलीबाबत विचारपूस केली असता त्याने तिचा खून केल्याचे सांगितले. घरी परतल्यानंतर दरवाजा उघडून पाहिले असता तिचा मृतदेह सोफ्यावर आढळून आला. 

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते, कर्मचारी चंद्रकांत फडतरे, अमोल पवार, कुंदन शिंदे, सर्फराज देशमुख, प्रणव सपकाळ आणि गणेश चिंचकर यांच्या पथकाने पतीला अटक केली.