पुण्यात साकारला राठोड यांचा पुतळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

पुणे - भारतीय लष्करातर्फे दुसरे महायुद्ध, भारत-पाकिस्तान युद्ध आदी महत्त्वपूर्ण मोहिमांमध्ये सहभागी झालेले... लेफ्टनंट जनरल या हुद्यावर राहून देशसेवा करणारे... रजपूत रेजिंमेंटमधील महत्त्वपूर्ण अधिकारी लेफ्टनंट जनरल नथूसिंग राठोड यांचा पुतळा बनविण्याचा बहुमान पुण्याचे शिल्पकार अभिजित धोंडफळे यांना मिळाला आहे. त्यांनी बनविलेला राठोड यांचा अर्धाकृती पुतळा लवकरच रेजिमेंटच्या मध्य प्रदेशातील फतेहगडच्या मुख्यालयात बसविण्यात येणार आहे.

धोंडफळे म्हणाले, ‘‘लेफ्टनंट जनरल राठोड यांच्या पुतळ्याचे काम करायला मिळणे, ही खूप अभिमानाची गोष्ट होती. पंचधातूमध्ये बनविलेल्या या अर्धाकृती पुतळ्याची उंची अडीच फूट आहे. हा पुतळा तयार करण्याचे काम गेले तीन महिने सुरू आहे. लष्करामधून मिळणारा हा सन्मान एखाद्या पुरस्कारा इतकाच महत्त्वाचा वाटतो.’’

धोंडफळे यांनी यापूर्वीदेखील विविध लष्करी अधिकाऱ्यांचे पुतळे बनविले आहेत. यामध्ये दिल्लीच्या माणेकशॉ सेंटरमधील फील्ड मार्शल सेम माणेकशॉ यांचा पुतळा, पुण्यातील लष्कर परिसरातील माणेकशॉ यांचा पुतळा, इराणमधील अहवाज येथे बसविण्यात आलेला मेजर जनरल महंमद जेहान आर यांचा १३ फूट उंच पूर्णाकृती पुतळा आदींचा समावेश आहे.