मानसिंग पाचुंदकर यांचा राजीनामा अखेर स्वीकारला

mansing pachundkar
mansing pachundkar

तळेगाव ढमढेरे (शिरूर, पुणे): गेले तीन-चार महिने राजीनाम्याविषयी तर्कवितर्क चालू असलेले पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा अखेर जिल्हा कमिटीने स्वीकारला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी "सकाळ'ला दिली. वैयक्तिक व व्यावसायिक अडचणींमुळे आगामी काळात पक्षाच्या संघटनात्मक कामाला वेळ देऊ शकत नसल्याने राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती पाचुंदकर यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांच्याकडे केली होती.

कामठे म्हणाले, "पाचुंदकर यांनी अल्प काळात पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे विचार ग्रामीण भागातील युवक व नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी अल्पावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक प्रश्नांवर आंदोलनांच्या माध्यमातून विशेष कामागिरी केली. जिल्ह्यात विविध ठिकाणी शाखा स्थापन केल्या. युवक मेळावे घेतले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शरद पवार यांनी त्यांचे कौतुक केले. आगामी काळात त्यांची अडचण दूर झाल्यानंतर त्यांना पक्षाची विशेष जबाबदारी पक्षनेते देणार आहेत.''

राजीनाम्याविषयी पाचुंदकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळली असून, आगामी काळातही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांशी बांधील राहून पक्ष देईल ती जबाबदारी माझी अडचण संपल्यानंतर सांभाळण्यास तयार आहे.''

जिल्हाध्यक्षपदासाठी उद्या मुलाखती
पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या नूतन अध्यक्षपदासाठीच्या मुलाखती शनिवारी (ता. 16) दुपारी 1 ते 3 या वेळात घेण्यात येणार आहेत. पक्षाच्या धनकवडी (पुणे) येथील कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती होतील. या वेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, मानसिंग पाचुंदकर तसेच पक्ष निरीक्षक म्हणून अभिषेक बोके उपस्थित राहणार आहेत. इच्छुकांनी नावे फोनद्वारे पाचुंदकर यांच्याकडे द्यावीत, मुलाखतीस येताना शक्तिप्रदर्शन न करता निवडक कार्यकर्त्यांसोबत यावे, असे आवाहन कामठे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com