नव्या बससाठी ३५ जागा हव्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

पुणे - पीएमपीच्या ताफ्यात या महिन्यात २०० बस येण्यास सुरवात होणार असल्यामुळे या बस उभ्या करण्यासाठी शहर-उपनगरांत जागांचे नियोजन प्रशासनाने सुरू केले आहे. त्यासाठी पुणे महापालिकेने १३, पिंपरी चिंचवड महापालिकेने १२ आणि पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाने (पीएमआरडीए) १० भूखंड प्राधान्याने द्यावेत, यासाठी पीएमपी प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला ‘शत प्रतिशत’ राजकीय पाठबळ मिळाल्यास प्रवाशांना सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

पीएमपीच्या ताफ्यात सध्या सुमारे २००० बस आहेत. त्यांच्यासाठी १२ आगार आहेत. परंतु या आगारांमध्ये बस उभ्या करण्यासाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे नरवीर तानाजी वाडी, मार्केट यार्ड, स्वारगेट, कोथरूड आदी अनेक ठिकाणी बस रस्त्यावर उभ्या कराव्या लागत आहेत.

पुण्यातील जागा - १३
 मुळा रोड (७ एकर),  पाषाण सूस रोड, सुतारवाडी (६ एकर),  अप्पर इंदिरानगर (१२ एकर),  येरवडा (२.५ एकर),  पर्वती फायनल प्लॉट (४ एकर),  खराडी (२.५),  वारजे (२ एकर),  लोहगाव (३ एकर),  कोंढवा बुद्रुक (२ एकर),  विश्रांतवाडी (१ एकर),  स्वारगेट जलतरण तलावाजवळील (३ एकर),  बाणेर (२ एकर),  कोथरूड बाह्यवळण रस्त्याजवळ (३.५ एकर) 

पिंपरी चिंचवडमधील जागा - १२
 दापोडी गाव (७.५ एकर),  पिंपळे सौदागर (३ एकर),  आकुर्डी एमआयडीसी (२.५ एकर),  मोशी  (५ एकर),  वडमुखवाडी (५ एकर),  तळवडे (५ एकर),  वाकड (५ एकर),  चऱ्होली (३.५ एकर),  रावेत (४ हेक्‍टर),  पिंपरी, गरवारे कंपनीजवळ (४ एकर),  चिंचवड (२.५ एकर),  डुडुळगाव (१ एकर)

Web Title: pune news new bus 35 place