ओरिगामी ही मेंदूला चालना देणारी कला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

पुणे - हाताच्या बोटांच्या बारीक हालचालींचा समावेश असलेली ओरिगामी मेंदूला चालना देते आणि मेंदूतील पेशींची पडझड थांबवण्यास मदत करते, असे मत ओरिगामी कलाकार, लेखक डॉ. अनिल अवचट यांनी गुरुवारी व्यक्त केले.

‘ओरिगामी मित्र’ आणि इंदूताई टिळक कला केंद्रातर्फे आयोजित केलेल्या ‘वंडरफोल्ड- २०१७’ या ओरिगामी कला प्रदर्शनाच्या उद्‌घाटनानंतर ते बोलत होते. टिळक स्मारक मंदिराचे अध्यक्ष व विश्वस्त डॉ. दीपक टिळक, दिवंगत ओरिगामी कलाकार विश्वास देवल यांच्या पत्नी रजनी देवल, तसेच ‘ओरिगामी मित्र’चे मिलिंद केळकर, ऋषिकेश सबनीस या वेळी उपस्थित होते.

टिळक स्मारक मंदिर येथे होत असलेल्या या प्रदर्शनात तीस ओरिगामी कलाकारांच्या तीनशेहून अधिक रचना मांडण्यात आल्या आहेत. यात भौमितिक रचना, जपानी ‘कुसुडामा’ ओरिगामी, तसेच ओरिगामीच्या त्रिमिती रचनांचाही समावेश आहे. प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत (ता. २९) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत खुले राहणार आहे. 

ओरिगामीबरोबरच मातीच्या वस्तू बनविणे (क्‍ले मॉडेलिंग) आणि दोऱ्यांचे खेळ (स्ट्रिंग गेम्स) या कलांचा त्यासाठी फायदा होतो, असे सांगून अवचट यांनी नवीन ओरिगामी कलाकारांचे कौतुक केले. इंदूताई टिळक आणि विश्वास देवल यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.