पेट्रोल दरवाढीने त्रस्त झालेले वळाले ई-बाईककडे

भरत पचंगे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

शिक्रापूर (पुणे): पेट्रोलच्या दरवाढीने त्रस्त झालेल्यांनी आता आपला मोर्चा इंधनविरहीत ई-बाईककडे वळवल्याचे चित्र पुणे जिल्ह्यातले असून, गेल्या दोन महिन्यात तब्बल १५०० ई-बाईकची विक्री एकट्या पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये झाली आहे.

दसरा-दिवाळीच्या तोंडावर इंधन दरवाढीला पर्यायाचे निमित्त करुन सर्व पेट्रोल दुचाकींना आव्हान देण्यासाठी महाराष्ट्रात तब्बल आठ स्वदेशी कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक-दुचाकी बाजारात उतवल्या असल्याने येत्या काळात पेट्रोल-बाईक विरुध्द ई-बाईक असेच विक्रीयुध्द बाजारपेठेत पहायला मिळणार हे नक्की.

शिक्रापूर (पुणे): पेट्रोलच्या दरवाढीने त्रस्त झालेल्यांनी आता आपला मोर्चा इंधनविरहीत ई-बाईककडे वळवल्याचे चित्र पुणे जिल्ह्यातले असून, गेल्या दोन महिन्यात तब्बल १५०० ई-बाईकची विक्री एकट्या पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये झाली आहे.

दसरा-दिवाळीच्या तोंडावर इंधन दरवाढीला पर्यायाचे निमित्त करुन सर्व पेट्रोल दुचाकींना आव्हान देण्यासाठी महाराष्ट्रात तब्बल आठ स्वदेशी कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक-दुचाकी बाजारात उतवल्या असल्याने येत्या काळात पेट्रोल-बाईक विरुध्द ई-बाईक असेच विक्रीयुध्द बाजारपेठेत पहायला मिळणार हे नक्की.

सन २०१४ मध्ये केंद्र आणि राज्यात सत्तेची खांदापालट होण्यात इंधन दरवाढीचा मुद्दा केंद्रस्थानी राहीला. मात्र, गेल्या तीन वर्षात फारसे आशादायक काही झाले नसल्याने तीन वर्षातील सर्वाधिक असा ८० रुपयांचा पल्ला पेट्रोलने गाठला. पर्यायाने सर्वसामान्य वाहनचालक इंधन खर्चाला पर्याय शोधत असतानाच इ-बाईक (इलेक्ट्रिक बाईक) घेवून तब्बल आठ कंपन्या दसरा-दिवाळीच्या तोंडावर पुणे शहर-जिल्ह्याच्या बाजारपेठेत उतरल्या आहेत. यात तुनवाल इलेक्ट्रॉनिक्स, लोहिया अ‍ॅटो, अजंता, अ‍ॅंपेरेर, एव्होन, क्रीस, ओकीनावा, हिरो आदी कंपन्यांनी आपली विविध प्रकारची दुचाकी मॉडेल्स बाजारात उतरवली असल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकार केडगाव (ता. दौंड) येथील मनोहर काळभोर यांनी दिली.

दरम्यान, सध्या आघाडीच्या सर्व पेट्रोल दुचाकी वाहनांसारखेच लूक, ट्यूबलेस टायर, चांगले सस्पेंशन, डिस्क ब्रेक, डिजीटल स्पीड मिटर, रिमोट कंट्रोल, ट्रीप सिस्टीम अशा सर्व सर्व अत्याधुनिक सुविधा सध्या पुणे शहर व जिल्ह्यातील बाजारपेठेत उतरलेल्या सर्व इ-बाईकमध्ये या कंपन्यांनी उपलब्ध करुन दिल्या असून, केवळ ५ रुपयात ७० किलोमिटर गाडी जात असल्याचा दावाही या कंपन्या करीत आहेत. दरम्यान, यातील सर्व कंपन्या स्वदेशी असून, ही सर्व ई-बाईक उत्पादने गुजरात मध्ये होत आहेत.

महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांपासून इ-बाईक रस्त्यावर चालत असल्या तरी पूर्वीचे ई-बाईक तंत्रज्ञान व आजचे तंत्रज्ञान यात खुपच फरक असून, सध्या २६ व २८ अ‍ॅंपीयरच्या १२ व्होल्टच्या बॅट-या तुनवाल इ-बाईक मध्ये वापरल्या असून एक वर्षात पूर्ण बदलून देण्याची ग्वाही आम्ही देत असल्याने ग्राहकांचा कल इ-बाईककडे चांगला असल्याची माहिती केडगाव (ता. दौंड) येथील जय मोटर्सचे संचालक गोवींद खोडवे यांनी दिली. दरम्यान, गेल्या दोन महिन्यात आम्ही ७५० गाड्यांची विक्री केली असून २०० किलो पर्यंत वजन चढालाही वाहून नेण्याच्या क्षमतेने गाड्यांची मागणी संपूर्ण जिल्ह्यातून मोठी आहे. पर्यायाने आम्हाला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकाच महिन्यात १९ डिलर्स नेमण्याशिवाय पर्याय राहीला नाही.

शिक्रापूर येथील जय भवानी-ई मोटर्सचे संचालक जयसिंग न-हे यांनी सांगितले की, शिक्रापूरात मागील दीड महिन्यात १८ इ-बाईक गाड्यांची विक्री झाली असून, येत्या दिवाळीपर्यंत जवळपास ३९ गाड्यांची बुकींगही माझ्या शोरुममध्ये झालेले आहे. अर्थात पेट्रोल दरवाढीमुळे अनेक जण ’जुनी घ्या नवी द्या’ असे म्हणत असून इंधन दरवाढीमुळे एवढा ग्राहक-रुचीत बदल होवू शकतो याचा आश्चर्यकारक अनुभव आम्ही सध्या ई-बाईकच्या  निमित्ताने घेत असल्याचेही श्री न-हे यांनी सांगितले.

ना लायसेन्स ना रजिस्ट्रेशनची गरज
दरम्यान इंधन आणि आवाज दोन्हींचे प्रदुषन नसलेली ही गाडी चालविण्यासाठी लायसेन्सची आणि आरटीओच्या नोंदणीचीही गरज नसल्याचे प्रमाणपत्र अ‍ॅटोमोबाईल रिसर्स अ‍ॅडमिनीस्ट्रेटीव्ह इन्स्टिट्यूटचे (IRAI) कडून तुनवाल ई-बाईकसाठी आमचेकडे आहे. पर्यायाने शेतकरी, महिला, विद्यार्थी व जेष्ठ नागरिक आदी सर्वांसाठी इंधनापासून मुक्तीबरोबरच वरील सर्व मुद्दे ग्राहकांना चांगलेच आकर्षित करीत असल्याचे गोवींद खोडवे यांनी सांगितले.