विरोधकांच्या अनुपस्थितीत 77 विकासकामे मंजूर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

पुणे - विरोधकांनी सभात्याग केल्यावर महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने सर्वपक्षीय नगरसेवकांचे विकासकामांचे चार महिन्यांपासून प्रलंबित असलेले 77 प्रस्ताव अखेर मंजूर केले. त्यामुळे महापालिकेचे कामकाज आता सुरळीत होणार आहे. 

महापालिकेचे नवे सभागृह मार्चमध्ये अस्तित्वात आले. फेब्रुवारी, एप्रिल, मे जून या चार महिन्यांत नगरसेवक आणि प्रशासनाने दाखल केलेले प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत होते. मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत चार महिन्यांच्या कार्यपत्रिकेवरील प्रस्ताव दाखल झाले होते. सभागृहातील कामकाजादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतरही सभागृहाचे कामकाज चालविण्याचा निर्णय सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने घेतला. त्यामुळे विरोधक सभागृहात नसताना सर्वपक्षीय नगरसेवकांचे प्रस्ताव मंजूर होताना दिसले. विरोधकांनी कामकाजात सहभागी व्हावे, यासाठी भाजपने प्रयत्न केले, परंतु सभागृहात येण्याचे विरोधकांनी टाळले आणि गटनेते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.