सायकल योजनेतील निधी तिसऱ्यांदा पळविला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

पुणे - शहरात आणि उपनगरांत 35 वेगवेगळ्या ठिकाणी महापालिकेतर्फे सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजेबल मशिन्स उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. एकात्मिक सायकल योजनेच्या निधीवर स्थायी समितीने तिसऱ्यांदा डल्ला मारला असून, त्यातील सुमारे पाच कोटी रुपये सॅनिटरी नॅपकिनच्या प्रकल्पासाठी वापरले आहेत. 

शहरात दररोज सुमारे 1600 टन कचरा निर्माण होतो. त्यातील 2 टन सॅनिटरी नॅपकिन असतात. हा कचरा नष्ट करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नाही. शहरात 41 पैकी 6 प्रभागांत सध्या सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजेबल मशिन्स आहेत. उर्वरित 35 प्रभागांतही प्रमुख ठिकाणी ही मशिन्स उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या मशिन्सची पुढील चार वर्षे महापालिकेतर्फेच देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पुन्हा एकदा सायकल योजना 
सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोजेबल मशिन्स बसविण्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद स्थायी समितीने वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून दिली आहे. हे पाच कोटी रुपये एकात्मिक सायकल योजनेतील होते. त्याबाबत विचारणा केली असता मोहोळ म्हणाले, ""सायकल खरेदीच्या निधीतील 11 कोटी रुपये आत्तापर्यंत वापरले आहेत. या योजनेतून 10 कोटी झाडण कामासाठी, 1 कोटी टेनिस कोर्टसाठी, तर 5 कोटी आता सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजेबल मशिन्ससाठी वळविण्यात आले आहेत. मात्र, सायकल योजनेला निधी कमी पडू देणार नाही.'' 

एकात्मिक सायकल योजनेसाठी 40 कोटी रुपयांचा निधी आहे. त्यातील 20 कोटी रुपये सायकल ट्रॅक उभारून अनुषंगिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, तर उर्वरित 20 कोटी सायकल खरेदीसाठी आहेत. शहरात सायकल ट्रॅक उभारण्याचे काम अजून सुरू झालेले नाही. सायकल खरेदीदेखील झालेली नाही. त्यामुळे सायकल ट्रॅकचा निधी तसाच राखून ठेवला आहे. 
- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती 

टॅग्स