समाविष्ट अकरा गावांच्या पाणीपुरवठ्याची फेररचना 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पुणे - महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावांच्या पाणीपुरवठ्याची फेररचना करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. त्यात ज्या गावांना सध्या अपुरा पाणीपुरवठा होतो, तेथील रहिवाशांना पुरेसे पाणी देण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत. या गावांमधील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नवी पाणीपुरवठा योजना आखण्याचे कामही तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

हद्दीलगतची अकरा गावे महापालिकेत घेण्याचा निर्णय झाल्यानंतर त्या-त्या गावांमध्ये पायाभूत सेवा-सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार गावांची पाहणी करण्यात येत आहे. त्यात रस्ते, पाणी, घनकचरा व व्यवस्थापन, वीज, आरोग्य या सेवासुविधा प्राधान्याने पुरविण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे; परंतु सद्यःस्थितीत फुरसुंगी, उरुळी देवाची, उंड्री, आंबेगाव (खुर्द व बुद्रुक), धायरी आणि मुंढव्यातील रहिवाशांना पाणीटंचाई भेडसावत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातील काही गावांना महापालिका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करत असली, तरी तो पुरेसा नसल्याची रहिवाशांची ओरड आहे. या गावांमधील सुमारे दोन लाख 85 हजार रहिवाशांना रोज सरासरी सव्वाचारकोटी लिटर पाणीपुरवठा करावा लागणार आहे; मात्र आजघडीला ते शक्‍य नसले, तरी काही गावांना पुरविण्यात येणाऱ्या टॅंकरच्या संख्येत वाढ करावी लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची फेररचना करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच पुढील 20 वर्षांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, ""महापालिकेत आलेल्या गावांसाठी सध्या तरी पाणीपुरवठा करण्याची गरज नाही. या सर्व गावांना सध्या तरी पाणी पुरविणे शक्‍य नाही. प्रत्येक गावात पुरेशी पाणीपुरवठा यंत्रणा आहे. महापालिकेच्या माध्यमातून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होतो; मात्र तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांमधील रहिवाशांना सोयीनुसार पाणीपुरवठा करता येईल.'' 

Web Title: pune news pmc village water