बोनस, अनुदानाबाबत न्यायालयात आज निर्णय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पुणे - बोनस आणि सानुग्रह अनुदान मिळावे, म्हणून पीएमटी कामगार संघाने (इंटक) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.  दरम्यान, याबाबत कामगारांनी औद्योगिक न्यायालयात याचिका  दाखल केली असून,सोमवारी याबाबत निकाल  लागणार आहे.

पीएमपीमधील कामगारांना ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान आणि महापालिका सेवकांच्या धर्तीवर १२ हजार रुपये बक्षीस हवे आहे; मात्र पीएमपी कर्जबाजारी असून तोटा ३४३ कोटी रुपयांवर पोचल्यामुळे बोनस, अनुदान देण्यास पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी नकार दिला आहे.  त्यामुळे इंटकने मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर आलेले असताना त्यांची भेट घेऊन बोनस मिळावा, अशी मागणी केली.  त्यांनी कार्यवाहीचे आश्‍वासन दिले आहे, असे कामगार संघाचे  अध्यक्ष राजेंद्र खराडे,  महासचिव नुरुद्दीन इनामदार यांनी पत्रान्वये कळविले आहे.

Web Title: pune news pmp employee diwali bonus court