महिला पोलिस अधिकाऱ्याची छेडछाड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

पुणे - पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्यास भर रस्त्यात दोघांनी अश्‍लील शेरेबाजी केली. तसेच त्याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पतीला दोघा तरुणांसमवेत असलेल्या महिलांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. याप्रकरणी दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली असून, दोन्ही महिला फरारी आहेत. 

सचिन राजेंद्र देडगे (वय 28, रा. वाल्मीकी वस्ती, रामटेकडी), शुभम भाऊसाहेब क्षीरसागर (वय 22, रा. प्रथमा बिल्डिंग, रामटेकडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. 

याप्रकरणी सहायक निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या महिलेने फिर्याद दिली. त्या कामानिमित्त बाहेर जात असताना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या गाडीला एक टेंपो आडवा आला. त्या वेळी त्यांनी संबंधित वाहनचालकाला गाडी व्यवस्थित चालविण्यास सांगितले. त्यानंतर देडगे व क्षीरसागर यांनी या महिला अधिकाऱ्याकडे पाहात अश्‍लील शेरेबाजी सुरू केली. त्यांनी मी पोलिस अधिकारी आहे, असे सांगूनही या दोघांनी शेरेबाजी सुरूच ठेवली. त्यांच्या पतीने त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, या दोघांनी त्यांच्यासोबत असलेल्या दोन महिलांच्या मदतीने त्यांना मारहाण केली. त्यांनी त्वरित याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळावरून या दोघांना अटक केली, तर दोघी महिला पळून गेल्या. वानवडी पोलिस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स