स्वतः तयार करा इकोफ्रेंडली गणपती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

पुणे - बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने बनवा, तेही पर्यावरणपूरक साधनांनी. इकोफ्रेंडली मूर्ती बनवून पर्यावरणाचे रक्षण करत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आजच सहभागी व्हा ‘सकाळ इको गणपती-२०१७’ या कार्यशाळेत. येत्या २० ऑगस्टपासून ही कार्यशाळा सुरू होत आहे.

पुणे - बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने बनवा, तेही पर्यावरणपूरक साधनांनी. इकोफ्रेंडली मूर्ती बनवून पर्यावरणाचे रक्षण करत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आजच सहभागी व्हा ‘सकाळ इको गणपती-२०१७’ या कार्यशाळेत. येत्या २० ऑगस्टपासून ही कार्यशाळा सुरू होत आहे.

विद्यार्थ्यांमधील कलागुण विकसित व्हावेत. या उद्देशाने ‘सकाळ’तर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रविवारी (ता. २०) सकाळी दहा ते साडेअकरा यावेळेत ही कार्यशाळा होईल. सिटी इंटरनॅशनल स्कूल (कोथरूड), पुणे सेंट्रल मॉल (कर्वे रस्ता), अभिरुची मॉल मल्टिप्लेक्‍स (सिंहगड रस्ता), एसएसएमएस सनविध इंग्लिश मीडियम स्कूल (पर्वती), नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल (निगडी), सीएम इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी), इस्ट कोर्ट-फोनिक्‍स्‌ मार्केट सिटी (विमाननगर), माऊंट लिथेरा झी स्कूल (वाकड) या ठिकाणी ही कार्यशाळा होणार आहे.

कार्यशाळेत सहभागी होण्याकरिता नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्याकरिता ५० रुपये प्रवेश शुल्क असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित नावे नोंदवावीत. तसेच कार्यशाळेस येताना कंपास पेटी, नॅपकिन, पाण्याची बाटली, जुने वर्तमानपत्र, बाउल, ब्रश आणावेत. ‘सकाळ’तर्फे कार्यशाळेच्या ठिकाणी शाडू माती देण्यात येईल. कार्यशाळेत तयार केलेली गणेशमूर्ती विद्यार्थी घरी घेऊन जाऊ शकतील. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रदेखील मिळणार आहे.

काय - सकाळ इको गणपती २०१७ 
कधी - रविवार, ता. २० ऑगस्ट सकाळी दहा ते साडेअकरापर्यंत.
संपर्क - ८८०५००९३९५
व्हॉट्‌सॲप क्रमांक - ९१४६०३८०३३

नावनोंदणीचे ठिकाण व वेळ -
पुणे सेंट्रल मॉल (कर्वे रस्ता) (दुपारी १ ते रात्री ८)
अभिरुची मॉल कॉम्प्लेक्‍स (सिंहगड रस्ता) (सकाळी ११ ते सायंकाळी ७)
एसएसएमएस सनविध इंग्लिश मीडियम स्कूल (सकाळी १० ते दुपारी २)
नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल (निगडी) (सकाळी ११ ते दुपारी ३)
सीएम इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी) (सकाळी १० ते दुपारी ४)
इस्ट कोर्ट-फोनिक्‍स मार्केट सिटी (विमाननगर) (दुपारी ४ ते रात्री ८)
नावनोंदणी १२ ते १७ ऑगस्टपर्यंत करावी (ता. १३ व १५ ऑगस्ट रोजी सुटी असल्याने नावनोंदणी होऊ शकणार नाही, याची नोंद घ्यावी).